शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

आईच्या योगदानामुळे मिळाली जीवनाला दिशा : राजेंद्र भारूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:03 IST

गुरूपोर्णिमा विशेष; 

राजकुमार सारोळे

सोलापूर : माझ्या जीवनात तीन गुरूंना महत्त्व आहे. पहिली गुरू माझी आई कमलाबाई. तिने माझ्या जीवनाला दिशा दिली असा अनुभव सांगताहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड. 

धुळे जिल्ह्यातील साक्री या आदिवासी पाडातील भारुड यांचे लहानपणीचे जीवन. अगदीच छोटे असताना वडिलांचे छत्र हरविले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांच्या आईची साथ सोडली. घरात कमालीचे दारिद्र्य. पोटाची भूक भागविण्याची चिंता, अशा परिस्थितीत तीन मुलांना घेऊन कमलाबाई गंभीरपणे उभ्या राहिल्या. स्वत: अशिक्षित असताना आपल्या मुलांना शिकवायचे ही जिद्द डोळ्यासमोर, समाजाची पर्वा न करता मिळेल ते काम करण्याची तयारी केली.राजेंद्र सरकारी शाळेत जाऊ लागले. गावात कसे वागायचे याचे धडे व संस्कार आईनेच दिले. पाचवीला नवोदय विद्यालयाला क्रमांक लागला. त्यामुळे गाव सोडून जावे लागले. त्यावेळी कमलाबार्इंचे डोळे पाणावले. पोटचा गोळा आपल्यापासून १५० किलोमीटर दूर जातोय. डोळ्यातील अश्रू लपवून त्यांनी राजेंद्र यांना निरोप दिला. आईच्या डोळ्यातील अश्रू ते विसरू शकले नाहीत. शिकून खूप मोठ्ठं व्हायचे आणि आईच्या कष्टाचे पांग फेडायचे या जिद्दीने ते नवोदय शाळेत दाखल झाले. दहावी आणि त्यानंतर बारावीला चांगल्या मार्काने पास होऊन मेडिकलला नंबर लागला. एमबीबीएस करून डॉक्टर झाले तरी आईचे स्वप्न होतं बेटा कलेक्टर झाला पाहिजे.एमबीबीएसनंतर जिद्दीने आयएएस झाले व त्यानंतर सरकारी गाडीने गावी गेल्यावर आईला आनंद झाला. या आठवणी सांगतानाच डॉ. भारुड यांनी आपल्या जीवनाचा शिल्पकार व गुरू म्हणून आईला स्थान असल्याचे नमूद केले. आजही व्यावहारिक काहीही निर्णय घ्यायचे झाल्यास आईचा सल्ला घेतो असे त्यांनी सांगितले. 

गुरुजींना अभिमान वाटतोशाळेतील माझे पहिले गुरू देवरे, पगारे आणि भारती मॅडम असल्याचे डॉ. भारुड यांनी सांगितले. सुटीत गावाकडे गेलो की त्यांची भेट घेतो. त्यांनी शाळेत केलेल्या मार्गदर्शनामुळे मी ही झेप घेऊ शकलो. प्रत्येक माणसाच्या जीवनात पहिला गुरू आई आणि नंतर शाळेतील शिक्षक व पुढे काम, व्यवसायात गुरू भेटतात. माझ्या गावातील निसर्ग हाही माझा तिसरा गुरू आहे. हिरवेगार डोंगर, ओढे, नाले असा सर्वसंपन्न निसर्ग माझा सोबती होता. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदGuru Purnimaगुरु पौर्णिमा