शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सोलापूर जिल्हा बँकेच्या २०८ शाखांमधून शेतकऱ्यांना ३६ कोटी रुपयांचे थेट पीक कर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 19:53 IST

थेट पीक कर्ज योजनेच्या जनजागृतीसाठी गावोगावी शेतकरी मेळावे

मंगळवेढा - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व २०८ शाखांमधून शेतकऱ्यांना तब्बल ३६ कोटी १४ लाख रुपयांचे थेट पद्धतीने अल्पमुदत पीक कर्ज  वाटप करण्यात आले आहे या अनोख्या  थेट पीक कर्ज योजनेचा शेतकऱ्यांनी  लाभ घ्यावा असे आवाहन डिसीसी बँकेचे मंगळवेढा तालुका पालक अधिकारी शब्बीर  मुजावर यांनी केले.

 सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथे  डिसीसी बँकेच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना थेट पद्धतीने अल्पमुदत पीक कर्ज योजनेची माहिती देताना मुजावर बोलत होते. याप्रसंगी मंगळवेढा शाखेचे बँक इंस्पेक्टर बी, डी राजमाने, सिनियर बँक इन्स्पेक्टर बी एस सोमगोंडे, बँक इंस्पेक्टर सी एम बोबलादे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बापुराया चौगुले दामाजी कारखान्याचे माजी संचालक जालिंदर व्हनूटगी माजी सरपंच संतोष सोनगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासो मलगोंडे, माजी उपसरपंच गंगाधर काकणकी, विकास सेवा सोसायटी चे नूतन चेअरमन महादेव चौगुले यांच्यासह नूतन संचालक उपस्थित होते.

यावेळी मुजावर पुढे म्हणाले, प्रशासक शैलेश कोथमिरे , सरव्यवस्थापक मोटे , व्यवस्थापक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनोखी अशी थेट पीक कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाने अनोखा उपक्रम राबवित बँकेचे अधिकारी वर्ग आपल्या गावापर्यंत येऊन याबाबत माहिती देत आहेत, सदरहू या योजनेचा लाभ घ्यावा, या योजनेची माहिती आपणास समजावी, यासाठी गावोगावी शेतकरी मेळावा घेत आहोत, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना बँकेतून थेट कर्ज मिळत आहे. ----------------------------------- शेतकऱ्यांना असा मिळणार लाभ एक वर्षाच्या आत घेतलेल्या कर्जाला तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज आकारले जाणार आहे. तीन लाख ते पाच लाख कर्जाच्या रकमेस एक वर्षानंतर दहा टक्के व्याज आकारले जाईल, या कर्ज योजनेत महत्वाची बाब शेतकन्यांना जामीनदाराची आवश्यकता नाही, बँकेच्या नियमानुसार शेतकऱ्यांना थेट रक्कम आपल्या खात्यावर जमा होईल, शेअर्स रकमेपोटी कोणतीही कपात घेतली जाणार नाही, नाममात्र सभासद असणे आवश्यक आहे असे पालक अधिकारी मुजावर यांनी सांगितले. अशी लागणार कागदपत्रे

थेट पीक कर्जासाठी कर्जदाराचे नोंदणी कृत गहाणखत आवश्यक इतर वित्तीय संस्थांचा बाकी दाखला आवश्यक, कर्जदाराचे बँकेच्या शाखेमध्ये व्यवहार असणे आवश्यक, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेमध्ये समावेश असतील. या कर्जासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड व पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, अर्जदाराचे दोन फोटो, जमिनीचा सातबारा, आठ अ, उतारे, सांगड पद्धतीने ऊस व फळ पिकांचे वसुलीचा अधिकार पत्र कर्ज मागणी अर्जासोबत विविध नमुन्यातील कायदेशीर दस्त, सिबिल बाबतची कागदपत्रे, अशी मोजकी कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांनी बँकेस संपर्क साधावा, हे कर्ज आपणास त्वरित मिळू शकते, असेही आवाहन मुजावर यांनी  केले. 

ज्या शेतकऱ्याकडे कोणत्याही वित्तीय संस्थेचे पिक कर्ज बाकी नाही, असे सर्व शेतकरी योजने अंतर्गत पात्र असतील, कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार पेक्षा जास्त ते पाच लाखापर्यंत आपणास कर्ज पुरवठा केला जाईल, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या डिसीसी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा- शब्बीर मुजावर , पालक अधिकारी मंगळवेढा

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक