शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सरपंचांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 17:01 IST

ग्रामीण रुग्णालयांना वैद्यकीय साधनांची उपलब्धता, जिल्हा परिषदांच्या शाळांचे बांधकाम आणि दुरूस्ती, पीककर्ज वाटप, पाणंद रस्ते याबाबत मागण्या केल्या.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांशी संवाद साधलाएकरूख उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची आग्रही मागणी

सोलापूर : तालुक्यातील सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुंबईत विधानभवनात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तालुक्याच्या प्रश्नांवर चर्चा करीत त्यांच्याशी संवाद साधला. प्रलंबित एकरूख उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली. 

सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी सोमवारी विधानभवनात मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची आवर्जून भेट घेतली. आपल्या गावचे प्रश्न आणि विकासकामांच्या मागण्यांची निवेदने संबंधित मंत्र्यांना सादर करीत गावाच्या विकासावर चर्चा केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान सरपंच संघटनेने मुख्यमंत्री सहायता निधीतून तालुक्यातील गरजूंना सर्वाधिक निधी मिळू शकल्याने अनेकांना आधार मिळाल्याचे सांगितले. याचवेळी सरपंचांनी स्थानिक विकासकामांची निवेदने मुख्यमंत्र्यांकडे सोपविली. यात ग्रामीण रुग्णालयांना वैद्यकीय साधनांची उपलब्धता, जिल्हा परिषदांच्या शाळांचे बांधकाम आणि दुरूस्ती, पीककर्ज वाटप, पाणंद रस्ते याबाबत मागण्या केल्या.

मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष पंडित अंबारे, उपाध्यक्ष सुशीला ख्यामगोंडे, सचिव विजयालक्ष्मी व्हनमाने, खजिनदार धर्मराज राठोड, मुख्य संघटक सिद्धाराम हेले, पंचायत समिती सदस्य एम.डी. कमळे, सरपंच शकील मकानदार, सुरेश देशमुख, श्यामराव हांडे, कलावती गिराम, सुरेश राठोड, ज्योती गावडे, आप्पासाहेब चितापुरे, रुक्माबाई माशाळे, रवींद्र कोळी यांच्यासह इंद्रजीत लांडगे, खंडोजी सुरवसे यांचा समावेश होता. पदाधिकाºयांनी विधीमंडळ कामकाज जाणून घेतले. 

एकरूख योजना मार्गी लावा- तालुक्यातील एकरूख उपसा सिंचन योजना ‘सुप्रमा’ नसल्याने अनेक वर्षे प्रलंबित आहे. ही योजना लवकर मार्गी लागली तर सिंचनाचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. योजनेतून वगळलेल्या १४ गावांचे सर्वेक्षण करून त्यांचा योजनेत नव्याने समावेश करावा, ही योजना तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यामुळे आमची मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची भेट होऊ शकली़ आमचे प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविता आले़ याचा आनंद वेगळाच आहे़ अनेक विषयांवर आमची चर्चा झाली़- सिद्धाराम हेले, सरपंच, तांदुळवाडी़

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस