शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस माझे भाऊ, भाजपने त्यांचा अवमान करू नये, सुप्रिया सुळेंचा टोला

By राकेश कदम | Updated: October 8, 2023 18:11 IST

शरद पवार गटाच्यावतीने शहरातील हैदराबाद रोडवर अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी त्या बोलत होत्या.

सोलापूर :  देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला वाटतं. राज्यात १०५ आमदार निवडून आणूनही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारलं. त्यांना उपमुख्यमंत्री केलं. आता आणखी एक उपमुख्यमंत्री आणून बसवला. ते माझे भाऊ आहेत. माझ्या भावाचा अपमान करू, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी लगावला.

शरद पवार गटाच्यावतीने शहरातील हैदराबाद रोडवर अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी त्या बोलत होत्या. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस सर्वच मेरीटवर पास झाले. त्यांना १० पैकी १० गुण मिळायला हवे. पण भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री करुन पाच गुणांवर आणले. आणखी एक उपमुख्यमंत्री आणून अडीच गुणांवर आणले. त्यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या काळात नागपूरमध्ये गुंडगिरी वाढली. 

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चूक झाली असेल पण त्यांच्यावर अन्याय करायला नको होता. भाजपकडून मराठी माणसांवर नेहमी अन्याय केला जातो. कर्नाटकात येडीयुरप्पा हे चांगले नेते आहेत. पण भाजपने त्यांचे खच्चीकरण केले. त्यांना घरी बसविले. त्यामुळेच भाजपचा पराभव झाला, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSolapurसोलापूर