शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरात आगमन; भाजप मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार प्रवेश

By appasaheb.patil | Updated: May 25, 2023 13:32 IST

सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार व शासकीय अधिकारी, भाजपाचे लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. 

सोलपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात आगमन झाले. सोलापूर विमानतळावर पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याचवेळी सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार व शासकीय अधिकारी, भाजपाचे लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान, दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास विमानतळावर दाखल झालेल्या फडणवीसांच्या हस्ते एक वाजता सात रस्ता येथील नियोजन भवनच्या शेजारी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. सध्या ते नियोजन भवनात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेत आहेत. त्यानंतर  दुपारी दोन वाजता सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विकासकामांचे फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण होणार आहे.

दरम्यान, सायंकाळी ४ वाजता हेरिटेज लॉन्स येथे आगमन होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक लोकप्रतिनिधी भाजपात प्रवेश करणार आहेत.  सायंकाळी ५:४५ वाजता सोलापूर विमानतळावरून विमानाने पुण्याच्या दिशेने प्रयाण करणार आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस