शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन महामंडळ करणार सोलापूरच्या संभाजी तलावाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:02 IST

पाच कोटींची तरतूद: प्राथमिक प्रकल्प अहवाल महापालिकेने फेटाळला

ठळक मुद्देशासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केला पर्यटन महामंडळातर्फे सुशोभीकरण करण्यात येणारमनपाने साडेतीन कोटींचा आराखडा तयार करून केंद्र शासनाकडे सादर

सोलापूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलावाचा विकास करण्यात येणार आहे. या अनुषंगाने पर्यटन विकास महामंडळाने प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेला प्रकल्प अहवाल महापालिकेने फेटाळला आहे.

धर्मवीर संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून ५ कोटी निधी मंजूर झाला असून, सुशोभीकरणाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात ५० लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.  

संभाजी तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे तलावात जलपर्णीची वाढ झाल्याने सौंदर्य धोक्यात आले आहे. या तलावाकडे दरवर्षी स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने येतात. अलीकडच्या काळात तलावात ड्रेनेजचे पाणी येत असल्याने जलचर व पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. 

याबाबत तक्रारी वाढल्यावर प्रदूषण मंडळाने मनपाला नोटीस दिली. त्यावर महापालिकेने तलावात येणारे ड्रेनेजचे पाणी बंद केले आहे. तलावाभोवती निसर्गरम्य झाडी व फुलझाडांची लागवड केल्यावर शहराचे वैभव वाढणार आहे. त्यामुळे  स्मार्ट सिटीमधील संभाजी तलावाचा पर्यटन म्हणून विकास केल्यास सोलापूर शहरातील नागरिकांना तसेच बाहेरून येणाºया पर्यटकांना तलावाकाठच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येणार आहे.

 यापूर्वी तलावाच्या सुशोभीकरणासाठी मनपाने साडेतीन कोटींचा आराखडा तयार करून केंद्र शासनाकडे सादर केला होता. केंद्र शासनाने निधी मंजूर केला पण वितरित केला नाही. त्यामुळे आराखड्यातील तरतुदीचा खर्च १२ कोटींपर्यंत गेला. सुशोभीकरण कामासाठी  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री जयकुमार रावल  यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.  पर्यटन विभागाकडून  संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०१७-१८ मधून ५ कोटींचा निधी मंजूर केला. पहिल्या टप्प्यात ५० लाख निधी दिला असून पुढील निधी टप्प्याटप्याने मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून तलावाचा विकास करण्यात येणार आहे. 

त्या अनुषंगाने पर्यटन महामंडळाने प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करून आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा केली. पण चुकीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आल्यामुळे आयुक्तांनी फेटाळून लावला आहे. 

धर्मवीर संभाजी तलावाच्या विकासासाठी शासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केला असून, पर्यटन महामंडळातर्फे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. प्राथमिक नियोजनात महामंडळाने विजापूर रोडच्या दिशेने मोठी भिंत बांधून त्यावर ऐतिहासिक चित्रे साकारण्याचा प्रकल्प अहवाल तयार केला होता. भिंत बांधल्याने तलावाचे सौंदर्य धोक्यात येणार असल्याने यात बदल सुचविला आहे.- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, महापालिका

टॅग्स :Solapurसोलापूर