शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

जिल्हा वार्षिक योजनेत ७४५ कोटींचा विकास आराखडा तयार -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

By संताजी शिंदे | Updated: May 1, 2023 16:28 IST

सोलापूरची प्रगतीच्या दिशेने वाटचाल

संताजी शिंदे, सोलापूर: जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासाची व लोकोपयोगी कामे होत आहेत. सन २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी जवळपास ७४५ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात चांगली प्रगती करत सोलापूर जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

कृषि क्षेत्रात जिल्ह्याची भरीव कामगिरी सुरू आहे. गेल्या वर्षी देशभरातून केळीचे सुमारे १६ हजार कंटेनर्स निर्यात झाले. त्यापैकी ५० टक्के कंटेनर्स एकट्या सोलापूर जिल्ह्याचे आहेत. करमाळा तालुक्यातील कंदर हे गाव केळीचे हब बनलेले आहे, याबद्दल अभिमान व्यक्त करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, बळीराजाला बळ देण्यासाठी कृषि विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. कृषि विभागाच्या विविध योजनांतून एकूण ४२ हजार ७३० शेतकऱ्यांना १९८ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान अदा केलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

उन्हाळी हंगामासाठी कालवा प्रवाहीसाठी तीन आवर्तनांसह चालू सिंचन वर्षामध्ये सिंचनाची एकूण पाच आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शेती उत्पादनात भर पडेल, असा विश्वास व्यक्त करून शंभरकर म्हणाले, विहित मुदतीत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून मागील वर्षी एकूण ३१ हजारहून अधिक शेतकऱ्यांना साडेसोळा कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. त्याचबरोबर गत वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानभरपाईपोटी १९१ कोटी ७३ लाख अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच चालू वर्षी मार्च व एप्रिलमध्येही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रूपये ३ कोटी ९२ लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. दोन्ही अनुदाने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर