शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ऊसाच्या फडातही देशमुख शाहीचे राजकारण सहकारमंत्री: आठ दिवसांनी बैठक; पालकमंत्री: उद्याच घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:15 IST

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दराबाबत कोल्हापूरमध्ये रविवारी काढलेला तोडगा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना मान्य नाही.  सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातही बैठक झाली पाहिजे, अशी शेतकरी संघटनांच्या नेत्यांची मागणी आहे.

ठळक मुद्देसहकारमंत्र्यांवर वेळकाढूपणाचा आरोप करीत शेतकरी संघटना संतापल्या साखर कारखानदार यांच्यात संघर्षाची चिन्हेपालकमंत्री म्हणाले, उद्याच बैठक लावू 

राकेश कदमसोलापूर दि ७ : साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दराबाबत कोल्हापूरमध्ये रविवारी काढलेला तोडगा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना मान्य नाही.  सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातही बैठक झाली पाहिजे, अशी शेतकरी संघटनांच्या नेत्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू न तत्काळ बैठक घेण्याची तयारी दर्शविली आहे तर सहकारमंत्र्यांनी १३ नोव्हेंबरची वेळ दिली आहे. सहकारमंत्र्यांवर वेळकाढूपणाचा आरोप करीत शेतकरी संघटना अधिकच संतापल्या आहेत. पालकमंत्री देशमुख यावर काय डाव टाकतात याकडे लक्ष आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबरपासून ऊस गाळपास सुरुवात केली आहे. ऊस दरावरून अनेक ठिकाणी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात संघर्षाची चिन्हे आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून रविवारी कोल्हापुरात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. तीत एफआरपी अधिक २०० रुपये देण्यावर एकमत झाले. त्यामुळे राज्यभरातील ऊसदराची कोंडी फुटली, असे वाटत होते, परंतु सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी हा तोडगा मान्य केलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना अशा विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन याप्रश्नी पुढाकार घेण्याची विनंती केली. -------------------पालकमंत्री म्हणाले, उद्याच बैठक लावू च्पालकमंत्र्यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर उतारा, उसाचे वजन यात घोळ घातले जात असल्याच्या तक्रारी केल्या. गेल्यावर्षी साखर दर कोसळलेले असतानाही कारखानदारांनी २५०० रुपयांची पहिली उचल दिली होती. आता ते साखर उताराच कमी दाखवत आहेत. त्यामुळे आम्हाला प्रतिटन जास्तीत जास्त २१०० रुपये मिळतील. ही फसवणूक आहे. यंदा साखरेला क्विंटलमागे ३३०० रुपये मिळत असल्याने उसाला टनामागे ३ हजार रुपये मिळालेच पाहिजेत. त्यावर पालकमंत्र्यांनी वजन मापे प्रशासन, उत्पादन शुल्क अशा विविध खात्यांसोबत उद्याच बैठक लावतो, असे आश्वासन दिले. आमदार प्रशांत परिचारक यांनाही फोन लावला. परिचारकांनी त्यांना यात सहकारमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालून तोडगा काढू, असे आश्वासन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले. -------------------सहकारमंत्री म्हणाले, लवकर हवे असेल तर मुंबईला या च्शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची त्यांच्या सोलापुरातील कार्यालयात जाऊन भेट घेतली. ‘बापू , तुम्हीही कारखानदार आहात. तुम्हीच पहिली उचल जाहीर करू न आदर्श ठेवा’, अशी विनंती केली. साखरेचा दर, साखर उताºयाचा घोळ असे विषयही कानावर घालून तोडग्यासाठी बैठक बोलवा, अशी मागणी केली. सहकारमंत्र्यांनी एक आठवड्यानंतरची वेळ दिली. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एवढा उशीर नको. लवकर बैठक घ्या, असे म्हणताच लवकर हवे असेल तर मुंबईला या, असे सांगितले. त्यामुळे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी संतापून बाहेर पडले.-----------------------मुख्यमंत्री लक्ष घालतीलपालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ऊसदर, साखर उताºयाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. यावर लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरूच राहील. - दीपक भोसले, रयत क्रांती संघटना, सोलापूर.  ------------------------सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडायला हवी                होती, परंतु ते वेळकाढूपणा करीत आहेत. ते साखर कारखानदार असल्यामुळे शेतकºयांच्या हिताचा निर्णय घेतील, असे वाटत नाही. तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. - संजय पाटील-घाटणेकर, प्रदेशाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना.