शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांना तब्बल ४५ लाखांचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 05:42 IST

ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या व्हाईस चेअरमनसह १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल

तुळजापूर : मुदत ठेव योजना, दामदुप्पट योजनांद्वारे जादा व्याज देण्याचे अमिष दाखवून ठेवीदारांना तब्बल ४५ लाख ३६ हजार ३४५ रूपयांचा चुना लावणाऱ्या ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या व्हाईस चेअरमनसह १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ जून २०१६ ते आजतागायत तुळजापूर शहरात घडली़बँकेचे व्यवस्थापक नारायण देविदास शिंदे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ बँकेचे व्हा़ चेअरमन भाऊसाहेब इंद्रराव शिंदे, सचिव दत्तात्रय नारायण बोरसे, सदस्य शिवाजी बाबुराव जाधव, शंकर शिवराम शिंदे, भास्कर तुकाराम खुर्दे, रफीक महंमद शेख, परसराम विठोबा काळे, संतोष चंद्रकांत आहिरे, विठ्ठल रंगनाथ वाघ, भगवान मुरलीधर बोराडे, वैशाली सतिश काळे, गंगुबाई संजय खताळे (सर्व रा़ स्टेशन रोड लासलगाव ता.निफाड जि.नाशिक) हे सर्वजन बँकेचे सदस्य आहे़ या सर्वांनी संगनमत करुन ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-आॅप. क्रेडिट सोसायटी लि शाखा तुळजापूर येथे ठेवीदारांना बँकेत मुदत ठेव योजना, दाम दुप्पट योजना, पेन्शन योजना, आर.डी.पिग्मी आदी योजनांची माहिती सांगून बँकेच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये इतर बँकांपेक्षा जादा व्याजदर देतो, ग्राहकांना आमिष दाखविले़ ग्राहकांना आमिष दाखवून तब्बल ४५ लाख ३६ हजार ३४५ रूपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़बँक व्यवस्थापक नारायण देविदास शिंदे यांच्या फिर्यादीवरून वरील १२ जणांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक माने या करीत आहेत़

टॅग्स :fraudधोकेबाजीSolapurसोलापूर