शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांच्या ठेवींना विमासुरक्षेचा ठेंगा

By admin | Updated: December 11, 2014 23:46 IST

सहकार आयुक्तांचे आदेश : विमा संरक्षण नसल्याचे फलक झळकविण्याची सूचना

सदानंद औंधे -मिरज -बुडित पतसंस्थांतील ठेवी परत देण्याच्या ठेवीदारांच्या तगाद्यामुळे वैतागलेल्या सहकार विभागाने आता पतसंस्थांतील ठेवींना विमा संरक्षण नसल्याचा इशारा फलक लावण्याचे आदेश सर्व पतसंस्थांना दिले आहेत. सहकार आयुक्तांच्या या परिपत्रकानुसार, पतसंस्थांत ठेवी ठेवल्यास शासन जबाबदार नसल्याचा इशारा अप्रत्यक्षरित्या ठेवीदारांना देऊन सहकार विभागाने हात झटकले आहेत.आर्थिक अडचणीत असलेल्या पतसंस्थांत ठेवीदारांची फसवणूक टाळण्यासाठी पतसंस्थांनी त्यांची आर्थिक स्थिती जाहीर करावयाची आहे. सहकारी पतसंस्थांमधील ठेवीस कोणतेही विमा संरक्षण नाही, असा फलक लावून संस्थेची आर्थिक माहिती उघड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे बंद पडलेल्या पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे हजारो कोटी रूपये अडकले आहेत. पतसंस्थांमध्ये मोठ्याप्रमाणात ठेवी अडकल्याने ठेवीदारांत असंतोष आहे. ठेवीदारांच्या असंतोषाचा सामना करणाऱ्या सहकार विभागाने गेल्या दोन वर्षात सहकार अधिनियमात सुधारणा करून, पतसंस्थेचे दैनंदिन कामकाज, ठेव संकलन, कर्जवाटप, वसुलीचे अधिकार व सर्व जबाबदारी संस्थांच्या संचालक मंडळावर टाकली आहे. मात्र बँकांप्रमाणे पतसंस्थांतील ठेवींना विमा संरक्षण नसल्याने पतसंस्थेत ठेव ठेवून ठेवीदार अडचणीत येऊ नयेत, यासाठी पतसंस्थेतील ठेवीस कोणतेही विमा संरक्षण नसल्याचा ठळक अक्षरातील फलक पतसंस्थेत लावण्याचा आदेश सहकार आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे. ठेवीदारांना सहकार विभागाने दिला अप्रत्यक्ष इशारापतसंस्थेच्या मागील तीन वर्षांच्या लेखापरीक्षणाचा, वर्ग तीन वर्षातील नफा-तोटा, संस्थेने केलेल्या गुंतवणुकीचा तपशील, ठेवी, कर्जाचे प्रमाण, कर्जवसुली रक्कम व प्रमाण अनुत्पादित कर्जे आदींची माहिती फलकावर लिहून, वेळोवेळी ती अद्ययावत करावयाची आहे. पतसंस्थेची ही सर्व आर्थिक माहिती इंटरनेटवरही प्रसिध्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. पतसंस्थांनी ठेवीदारांच्या प्रबोधनासाठी संस्थेची आर्थिक माहिती उघड करावी, असेही परिपत्रकात म्हटले असले तरी, ठेवींची जबाबदारी टाळण्यासाठी सहकार विभागाने ठेवीदारांना इशारा दिल्याचे मानले जात आहे. सहकार आयुक्तांच्या आदेशामुळे आता पतसंस्थांना आर्थिक स्थितीची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रसिध्द करावी लागणार आहे.सांगली जिल्ह्यात ८८ संस्थांचे वाजले बारासांगली जिल्ह्यात ८८ पतसंस्था अडचणीत आल्याने त्यातील ठेवीदारांच्या १२१ कोटीच्या ठेवी अडकल्या होत्या. शासनाचे पॅकेज व कर्जवसुलीद्वारे गेल्या पाच वर्षात सुमारे ८० कोटी वसूल झाले, तरी अद्याप पतसंस्थांत अडकलेल्या ४० कोटींच्या ठेवी असुरक्षित आहेत. पतसंस्थांवर नियंत्रण ठेवणे शासनाला जमत नाही. त्यामुळे इशाऱ्याचे फलक लावण्यासारख्या किरकोळ उपाययोजना करण्यात येत आहेत. बँकांप्रमाणे पतसंस्थांच्या आर्थिक व्यवहाराचे नियंत्रण रिझर्व बँकेकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे रवींद्र ढोबळे यांनी केली आहे.