शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गाळे घोटाळा, संजय कोकाटे यांची चौकशी करण्याची मागणी; सभापती संजय शिंदे यांच्यावर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 13:14 IST

कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या १२ वर्षांत पणन संचालकांची परवानगी न घेता ७०० ते ८०० गाळ्यांचे बांधकाम करुन विक्री केली. या गाळ्यांच्या भाडे वसुलीचा हिशोब समितीकडे नाही.

ठळक मुद्देकुर्डूवाडी बाजार समितीचे टेंभुर्णी, मोडनिंब, माढा येथील पोटभाडेकरुंचे करार नाहीत. खोटी पावतीपुस्तके छापून वसुली केली जाते. वसूल रकमेचाही हिशोब नाही२००६ ते २०१७ पर्यंतच्या लेखापरीक्षणाची तपासणी व्हावी. बांधकामाचेही लेखापरीक्षण व्हावे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाºया लेखापरीक्षकाचीही चौकशी व्हावीबाजार समितीची जमीन, व्यवहारांची निष्पक्ष तपासणी होईपर्यंत संचालक मंडळ बरखास्त करावे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या १२ वर्षांत पणन संचालकांची परवानगी न घेता ७०० ते ८०० गाळ्यांचे बांधकाम करुन विक्री केली. या गाळ्यांच्या भाडे वसुलीचा हिशोब समितीकडे नाही. भाडे वसुलीची पावतीपुस्तके समितीकडे उपलब्ध नसल्याची निरीक्षणे लेखापरीक्षण अहवालात नोंदविण्यात आली आहेत. इतर अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यातून बाजार समितीत ४० ते ४५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपाचे माढा तालुका अध्यक्ष तथा कुर्डूवाडी बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक संजय कोकाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. या प्रकरणांना बाजार समितीचे सभापती संजय शिंदे जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.कोकाटे म्हणाले, शासनाने आमची तज्ज्ञ संचालक म्हणून कुर्डूवाडी बाजार समितीच्या संचालकपदी नियुक्ती केली. समितीच्या बैठकीला गेल्यानंतर अनेक संचालक अनुपस्थित असल्याचे लक्षात आले. पुढील बैठकीत मात्र हे संचालक हजर असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. त्यांना या बैठकीचा भत्ताही मंजूर असल्याचे दिसले. समितीच्या लेखापरीक्षण अहवालाची माहिती घेतली. बाजार समितीच्या मिळकतीवर शेतकरी व शेतीविषयक सेवा देण्यासाठी प्रयोजन आवश्यक आहे. परंतु अनेक जागांच्या वापरात परस्पर बदल करण्यात आले आहेत. बरीच जागा वापरात असताना खुली दाखवली आहे. १७ एकर जागेत शॉपिंग सेंटर बांधून ७०० ते ८०० गाळे विकले आहेत. यातील बहुतांश गाळे आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे यांच्या नातेवाईकांना आणि जवळच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. गरीब माणसांना जास्त भाडे आणि शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना कमी भाडे आकारले जाते. टेंभुर्णी येथील बाजार समितीच्या जागेत रणजितसिंह शिंदे यांच्या माध्यमातून गॅस गोडावून करण्यात आले आहे. या गोदामात ज्वालाग्रही पदार्थ आहेत. अनुचित प्रकार घडल्यास पूर्ण टेंभुर्णी गावाचे भवितव्य धोक्यात येईल, असा आरोपही कोकाटे यांनी केला. पत्रकार परिषदेला नागनाथ कदम, धनंजय महाडिक उपस्थित होते. ---------------------------कोकाटे यांचे इतरही आक्षेप- बाजार समितीचे सचिव रघुनाथ कदम यांचे वय ६० पेक्षा जास्त आहे. असे असताना गैरप्रकार, जमीन बांधकाम गैरव्यवहार लपविण्यासाठी त्यांची खोटी कागदपत्रे करुन सेवानिवृत्ती करण्यात आलेली नाही. - कुर्डूवाडी बाजार समितीचे टेंभुर्णी, मोडनिंब, माढा येथील पोटभाडेकरुंचे करार नाहीत. खोटी पावतीपुस्तके छापून वसुली केली जाते. वसूल रकमेचाही हिशोब नाही. - २००६ ते २०१७ पर्यंतच्या लेखापरीक्षणाची तपासणी व्हावी. बांधकामाचेही लेखापरीक्षण व्हावे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाºया लेखापरीक्षकाचीही चौकशी व्हावी. - बाजार समितीची जमीन, व्यवहारांची निष्पक्ष तपासणी होईपर्यंत संचालक मंडळ बरखास्त करावे.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती