परिते (ता़ पंढरपूर, जि़ सोलापूर) : पंढरीच्या पांडुरंगाच्या मुखदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते़ त्यामुळे मंदिर समितीने मुखदर्शन रांगेतील सुसूत्रता आणावी व वाळवंटातील पिण्याच्या पाण्याची लवकरात लवकर सोय करावी, अशी मागणी वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह. भ. प. विष्णुपंत कुंभार यांनी केली आहे. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी अधिक मासानिमित्त मोठ्या प्रमाणात भक्त पंढरीत दाखल होतात. अनेक भक्त मुखदर्शन घेऊन परतात. त्यामुळे या रांगेमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होते़ या रांगेत सुसूत्रता यावी, यासाठी आता मंदिर समितीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
पांडुरंगाच्या मुखदर्शन रांगेत सुसूत्रता आणण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:46 IST