शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

बार्शीतील डॉक्टरचे अपहरण करून १० लाखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:17 IST

१० लाख रुपयांची मागणी करीत जिवे ठार मारण्याची धमकी देणाºया तिघांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.

बार्शी : येथील डॉ. नंदकुमार रामलिंग स्वामी यांचे अपहरण करून त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करीत जिवे ठार मारण्याची धमकी देणाºया तिघांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. अन्य दोघे फरार आहेत. 

ज्ञानेश्वर उर्फ बप्पा सुरेश लावंड (३१, रा. फुले प्लॉट, बार्शी), उमेश चंद्रकांत मस्तुद (३३, रा. सुभाषनगर, बार्शी) व रंजना तानाजी वणवे (४१, रा. बारामती) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे असून, अनिल शिंदे व सोमा या दोघा फरारींचा शोध पोलीस घेत आहेत. ९ जुलै रोजी दुपारी आरोपींनी ‘तुमच्यावर गर्भलिंग निदान केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यात तुम्ही भरपूर पैसे कमावले आहेत. आम्हाला १० लाख रुपये द्या’ अशी मागणी करीत त्यांचे अपहरण करीत १० लाखांची मागणी केली. डॉ. स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपींवर भादंवि. ३६४ (अ), ३४१, ३२३ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्यातील एमएच-४५/८२१५ व एमएच-४२/वाय १०११ या दोन कार जप्त केल्या. तिघा आरोपींना सपोनि दिगंबर गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत आदलिंगे, सहदेव देवकर यांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. 

वैद्यकीय व्यवसाय बंद करून शेती- डॉ. स्वामी हे बार्शीतील दत्तनगर येथे राहत असून, त्यांनी २५ वर्षांपूर्वी निसर्ग उपचार महाविद्यालयातून पदवी घेतली. बार्शीत त्यांनी निसर्गोपचार केंद्र सुरू केले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी ते केंद्रही बंद केले. वैद्यकीय व्यवसाय बंद करून ते शेतीकडे वळले. घटनेच्या दिवशी पेरणी करून आल्यानंतर दुपारी मंगळवार पेठेतून दुचाकीवरून जातेवेळी यातील आरोपींनी त्यांची गाडी आडवी लावून गाडीतील दोघांनी उतरून मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘मी वैद्यकीय व्यवसाय बंद केला आहे’ असे सांगत असतानाही आरोपींनी त्यांच्याकडे १० लाखांची मागणी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस