शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘देह’ विक्री सोडली..आता रुग्णांची ‘देह’सेवा केली...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 12:57 IST

जागतिक वारांगणा व्यवसाय विरोधी दिन : २३१ महिला आल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात

ठळक मुद्देजिथे महिला आज घरात सुरक्षित नाही ते घरदार, नातेवाईक सोडून जेव्हा बाजारात खुलेआम देहविक्री करतातया महिलांना दररोज अन्याय-अत्याचार सहन करावा लागतो. ज्यांना यातून बाहेर पडायचं आहे त्यांना आम्ही अन्य रोजगाराचा मार्ग दाखवतोज्या देहविक्री करतात त्यांच्या अडचणी सोडवतो. ज्यांची इच्छा आहे त्यांना नरकातून बाहेर काढतो

संताजी शिंदे 

सोलापूर : परिस्थितीसमोर शरणागत होऊन वारांगणा बनलेल्या काही महिलांनी ‘देह’ विक्री सोडली... आता रुग्णांची ‘देह’ सेवा करत त्या आयुष्य आनंदाने घालवत आहेत. गेल्या बारा वर्षांत २३१ महिला छोटा-मोठा व्यवसाय करत मुख्य प्रवाहात आल्या आहेत.सोलापूर शहरासह जिल्ह्यातील देहविक्री करणाºया सुमारे अडीच   हजार वारांगणा आहेत. प्रेमामध्ये दगाफटका, घरची परिस्थिती बिकट, तसेच लहान वयातच वासनेची   शिकार झाल्यामुळे अशा एक ना   अनेक कारणास्तव या मुली देहविक्रीचा व्यवसाय पत्करून वारांगणा झाल्या. आपलं गाव सोडून जिथे कोणी ओळखीचा नाही अशा ठिकाणी जाऊन देहविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. मराठवाडा, विदर्भ,   मुंबई, पुणे, कर्नाटक अशा अनेक ठिकाणाहून सोलापुरात येऊन देहविक्रीचा व्यवसाय करीत आहेत.

आपण तरुण आहोत तोपर्यंत आपला व्यवसाय चालेल त्यानंतर मग काय करायचं? असा प्रश्न भेडसावणाºया बहुतांश महिलांनी  क्रांती महिला संघटनेकडे यातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली होती. या महिलांना या संंघटनेने रुग्णालयात आयाचे काम दिले. शिवाय भाजीपाला व्यवसाय, हॉटेलमध्ये साफसफाई करणे आदी कामे दिली. सध्याच्या स्थितीमध्ये   १५० महिला अशा पद्धतीने विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सहा महिलांना चार चाकी वाहनाचे लायसन काढून देण्यात आले आहे. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या वतीने ७५    महिलांची लघु उद्योगाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. 

नरकातून बाहेर काढतो : रेणुका जाधवजिथे महिला आज घरात सुरक्षित नाही ते घरदार, नातेवाईक सोडून जेव्हा बाजारात खुलेआम देहविक्री करतात त्यांची अवस्था खूपच बिकट आणि दयनीय आहे. या महिलांना दररोज अन्याय-अत्याचार सहन करावा लागतो. ज्यांना यातून बाहेर पडायचं आहे त्यांना आम्ही अन्य रोजगाराचा मार्ग दाखवतो. ज्या देहविक्री करतात त्यांच्या अडचणी सोडवतो. ज्यांची इच्छा आहे त्यांना नरकातून बाहेर काढतो अशी माहिती क्रांती महिला संघटनेच्या अध्यक्षा रेणुका जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूर