शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाळू लिलावाअभावी गौण खनिजच्या महसूलात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:09 IST

सोलापूर जिल्ह्याला ११८ कोटींचे होते उद्दिष्ट; मात्र प्रत्यक्षात ८५ कोटीच मिळाला महसूल

ठळक मुद्देमार्च २0१९ पर्यंत केवळ ८५ कोटी रुपयांचाच महसूल जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाकडे जमाउत्तर सोलापूर तहसील कार्यालयास  ७ कोटींचे उद्दिष्ट होते, या तालुक्यात ७ कोटी ५६ लाखांचा महसूल जमा झालादक्षिण सोलापूर तहसील कार्यालयास १५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते, या तालुक्यात उद्दिष्टापेक्षा जास्त १७ कोटी रुपये म्हणजे  ११३ टक्के महसूल जमा

सोलापूर : मागील दोन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात वाळू लिलावच होत नसल्याने गौण खनिज विभागाचा महसूल उद्दिष्टापेक्षा ३३ कोटींनी कमी झाला आहे. सन २0१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता गौण खनिज विभागास शासनाने ११८ कोटी महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मार्च २0१९ पर्यंत केवळ ८५ कोटी रुपयांचाच महसूल जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाकडे जमा झाला आहे. 

उत्तर सोलापूर तहसील कार्यालयास  ७ कोटींचे उद्दिष्ट होते. या तालुक्यात ७ कोटी ५६ लाखांचा महसूल जमा झाला आहे.१0८ टक्के वसुली या तालुक्यात झाली आहे. बार्शी तहसील कार्यालयास ६ कोटीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. यापैकी ३ कोटी १२ लाखांचा महसूल जमा झाला आहे. केवळ ५२ टक्केच वसुली या तालुक्यातून झाली आहे. 

दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयास १५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या तालुक्यात उद्दिष्टापेक्षा जास्त १७ कोटी रुपये म्हणजे  ११३ टक्के महसूल जमा झाला आहे. अक्कलकोट तहसील कार्यालयास १८ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी या तालुक्याने फक्त ६ कोटी ७६ लाख म्हणजे ३७ टक्केच महसूल वसूल केला आहे. 

माढा तहसील कार्यालयास ७ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी या तालुक्याने ३ कोटी ५१ लाख म्हणजे ५0 टक्के महसूल वसूल करण्यात वर्षभरात यश मिळविले आहे. करमाळा तहसील कार्यालयास ७ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी या तालुक्याने १ कोटी ३६ लाख म्हणजे १९ टक्केच उद्दिष्ट पूर्ण केले आहे. 

पंढरपूर तहसील कार्यालयास १७ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ५ कोटी ९२ लाखांचा महसूल जमा झाला आहे. वर्षभरात ३४ टक्केच वसुली या तालुक्यातील झाली आहे. मोहोळ तहसील कार्यालयास ९ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ३ कोटी ७३ लाख म्हणजे ४१ टक्के महसूल जमा झाला आहे. 

मंगळवेढा तहसील कार्यालयास १४ कोटींचे महसूल उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ८ कोटी १८ लाखांचा  म्हणजे ५८ टक्केच महसूल जमा झाला आहे. माळशिरस तहसील कार्यालयास ९ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ८ कोटी ९२ लाख म्हणजे ९९ टक्के महसूल जमा झाला आहे. 

 मुरूम आणि दगड टॉपवर !भीमा नदीत होणाºया वाळू लिलावामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागास यापूर्वी सर्वाधिक महसूल मिळत होता. मात्र अलीकडच्या काही काळात वाळू लिलावात अनेक अडथळे येत असल्याने या माध्यमातून मिळणारा महसूल अत्यंत कमी झाला आहे. दगडखाणी व मुरुम आदीच्या माध्यमातून गौण खनिजला मिळणारा महसूलच सर्वाधिक ठरत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय