शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी स्थायी सभेत निर्णय; आरोग्याचे साहित्य खरेदीच्या विलंबाची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 15:28 IST

लॉकडाऊनमध्ये दांडी मारणाºयाच्या सेवा पुस्तकावर नोंद; उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांना शासनाकडे परत पाठविण्याबाबत ठराव

ठळक मुद्देझेडपी स्थायी समितीची सभा अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, आनंद तानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या उपस्थितीत झालीसभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार उपस्थित नव्हते. फॉर्मसीस्ट सोळंकी यांनी थातूरमातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न

सोलापूर: कोरोना साथीनंतरही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची साहित्य खरेदी लटकल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.

झेडपी स्थायी समितीची सभा अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, आनंद तानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या उपस्थितीत झाली. सभेच्या सुरूवातीलाच उमेश पाटील यांनी कोरोनाची साथ सुरू होऊन दोन महिने झाले तरी आरोग्य विभागाने डॉक्टर, कर्मचाºयांना आवश्यक असलेले सुरक्षा साहित्य, औषध आणि मशीनरीची खरेदी का केली नाही असा सवाल उपस्थित केला. अध्यक्षांनी सही करण्यास टाळाटाळ केली अशी चर्चा होती खरे काय याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली.

त्यावर अध्यक्ष कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी फाईल आली त्या दिवशीच सही केल्याचे स्पष्ट केले. सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार उपस्थित नव्हते. फॉर्मसीस्ट सोळंकी यांनी थातूरमातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. पदाधिकाºयांऐवजी प्रशासन या प्रकाराला जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. विभागाचे प्रमुख म्हणून या गंभीर प्रकाराला आरोग्य अधिकारी डॉ. जमादार जबाबदार आहेत. यामुळे जिल्हा परिषदेची तर बदनामी झालीच तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांचा जीव धोक्यात आला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर यापुढे कोरोना साथीसंबंधी कोणतीही फाईल असो त्यावर एक दिवसात निर्णय घेण्याचे ठरले.

त्याचबरोबर लॉकडाऊन काळात कोरोनाच्या साथीच्या उपाययोजनांसाठी विभाग प्रमुखांनी कार्यालयात हजर रहावे असे आदेश दिलेले असताना बºयाच जणांनी दांडी मारली. याप्रकरणी सीईओंनी तीन अधिकाºयांना विनावेतन करण्याची नोटीस दिली. आणखी काही अधिकारी बाजूला राहिले आहेत. या सर्वांच्या सेवा पुस्तकावर ही नोंद घेण्याचा ठराव करण्यात आला. ------------ लोंढे यांना परत पाठवाउप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांना शासनाकडे परत पाठविण्याबाबत पुन्हा ठराव घेण्यात आला. पत्र देऊन व माहिती अधिकारातही त्यांनी स्वच्छ भारत मिशनवरील खर्चाचा हिशोब दिला नाही. त्यांच्यामुळे सन १७—१८ मध्ये समाजकल्याणचे १६ कोटी परत गेले आहेत. इतर विभागाचा निधी किती परत गेला यावर चर्चा झाली. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद