शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या गणेशोत्सवात सोलापूर जिल्ह्यातील ७०२ गावांनी घेतला हा निर्णय

By appasaheb.patil | Updated: August 26, 2020 11:57 IST

सोलापूर लोकमत विशेष...

ठळक मुद्देसार्वजनिक गणेशोत्सवापासून सोलापूर जिल्ह्यातील ७०२ गावं राहिली स्वत:हून दूर ग्रामस्थांची भूमिका : २२९ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ची प्रतिष्ठापना यंदा जिल्ह्यात फक्त ६८८ सार्वजनिक तर २२९ गावात ‘एक गाव एक गणपती’ची प्रतिष्ठापना

सुजल पाटील 

सोलापूर : कोरोनामुळे यंदा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील ७०२ गावांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे़ दरम्यान, यंदा जिल्ह्यात फक्त ६८८ सार्वजनिक तर २२९ गावात ‘एक गाव एक गणपती’ची प्रतिष्ठापना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

ग्रामीण भागात वाढत्या कोरोनाची परिस्थिती पाहता यंदाच्या गणेशोत्सवात कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही, कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, गणेशोत्सव व मोहरम उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना  जिल्हा व ग्रामीण पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या़ जिल्ह्यातील विविध भागात ग्रामीण पोलिसांनी शांतता कमिटीच्या बैठका घेऊन गणेशोत्सव व मोहरम साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते़ शिवाय कोरोनामुळे गावात यावर्षी गणेशोत्सव साजरा करू नका, गावातील प्रत्येकाची काळजी घ्या, संसर्ग टाळा, सामाजिक कार्यक्रमांवर भर देण्याचे साकडे घातले होते़ या पोलिसांच्या हाकेला साथ देत जिल्ह्यातील ७०२ गणेश मंडळांनी यंदा आपल्या गावात गणपतीची प्रतिष्ठापना केली नसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

असा आहे गणेशोत्सव, मोहरमचा बंदोबस्तसोलापूर जिल्ह्यात साजरा होणाºया गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक ०१, अपर पोलीस अधीक्षक ०१, उपविभागीय पोलीस अधिकारी ०७, वरिष्ठ पोलीस निरीक्षक २६, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ९३, पोलीस कर्मचारी १८५०, आरसीपी पथक ०४, क्यूआरटी पथक ०२, स्ट्रेकिंग ०९, एसआरपीएफ ०२, होमगार्ड ७०० असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ 

गणपती न बसविलेल्या मंडळांची पोलीस ठाणेनिहाय संख्या सोलापूर तालुका - २२, मोहोळ - ५०,    मंद्रुप - ३८, कामती - १२, अक्कलकोट उत्तर - १६,            अक्कलकोट दक्षिण - २५, वळसंग - ०८, वैराग - ३४, माढा - ३३, पांगरी - २६, करमाळा - ९१, करमाळा - २६,  करमाळा - ९१, टेंभुर्णी - १०,  कुर्डूवाडी - ११,  पंढरपूर तालुका - ५२, करकंब - १९, मंगळवेढा - ८०, सांगोला - १०३, माळशिरस - ०५,

मोहरम उत्सवाबाबत...सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत मागील वर्षी ९८७ ठिकाणी पंजे, २९८ ठिकाणी डोले, २५३ ठिकाणी सवारी तर २५३ ठिकाणी ताबूत बसविण्यात आले होते़ यंदा कोरोनामुळे जिल्ह्यात फक्त २१५ ठिकाणी पंजे, ५९ ठिकाणी डोले, १०९ ठिकाणी सवारी तर २४ ठिकाणी ताबूत बसविण्यात आले आहेत़ 

शासनाने कोविड १९ च्या परिस्थितीत गणेशोत्सव व मोहरम मर्यादित स्वरुपात साजरा करावा, उत्सव काळात कोठेही गर्दी करू नये, उत्सव कालावधीत धार्मिक पूजाअर्चा करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या मर्यादाचे पालन करावे़ याशिवाय गणेशोत्सव व मोहरम उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याबाबत काळजी घ्यावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे़- अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलीस दल

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसGanesh Mahotsavगणेशोत्सव