शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अनुदान कालावधी वाढीच्या निर्णयावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 10:53 IST

सोलापूर : कार्यक्रम सुरू असताना प्रास्ताविकात कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याची मागणी झाली. सहकार मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लागलीच मोबाईलवरुन कांदा अनुदानाचा ...

ठळक मुद्देआजपर्यंत कांद्याला कधीही प्रति क्विंटल ५० रुपयांपेक्षा अधिक अनुदान मिळाले नाही२०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही यांना बाजूला फेका, असे सहकार मंत्री देशमुख यावेळी म्हणाले. 

सोलापूर: कार्यक्रम सुरू असताना प्रास्ताविकात कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याची मागणी झाली. सहकार मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लागलीच मोबाईलवरुन कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याचा एसएमएस पाठविला अन् मुख्यमंत्र्यांनी ओके असा रिप्लाय दिला. 

विविध शासकीय योजनेतून निधी व साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्तर तालुक्यातील मार्डी येथे झाला. त्या कार्यक्रमात भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम यांनी कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. याशिवाय तालुक्यातील २४ गावांचा विकास खुंटल्याची खंत व्यक्त केली.

रस्ते खराब झाले, २५: १५ योजनेचा निधी मिळत नाही व अन्य समस्या मांडल्या. हाच धागा पकडून खा. अमर साबळे यांनी प्रास्ताविकात उपस्थित होणारे मुद्दे शेतकºयांशी संबंधित असल्याने सहकार मंत्री सुभाष देशमुख हे लागलीच मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून समस्या मांडत आहेत असे सांगितले. त्यानंतर सहकार मंत्र्यांनी भाषणात मुख्यमंत्र्यांना पाठविलेला मेसेज वाचून दाखविला. कांद्याचे दर आणखीन वाढलेले नाहीत, जानेवारी अखेरपर्यंत कांदा अनुदानाची मुदत वाढविणे गरजेचे आहे असा हा एसएमएस होता. त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी ओके असे पाठविल्याचेही सहकार मंत्र्यांनी सांगितले. उद्या होणाºया मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, असेही सहकार मंत्री देशमुख म्हणाले. 

आजपर्यंत कांद्याला कधीही प्रति क्विंटल ५० रुपयांपेक्षा अधिक अनुदान मिळाले नाही. आम्ही प्रति क्विंटल १०० रुपये व नोव्हेंबर महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रति क्विंटल २०० रुपये व १५ फेब्रुवारीपर्यंतच्या कांदा विक्रीवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला, असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.

तिजोरीच्या चाव्यावाल्यांनी काय केले?राज्याच्या तिजोरीच्या चाव्या १४ वर्षे उत्तर सोलापूर तालुक्याच्या हातात होत्या, त्यांनी काय कामे केली?,असा प्रश्न सुशीलकुमार शिंदे यांचे नाव न घेता सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला. हेच आता विष पेरण्याचे काम करीत आहेत, २०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही यांना बाजूला फेका, असे सहकार मंत्री देशमुख यावेळी म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार