शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; सोलापूर शहराबरोबरच या तालुक्यातही लागू होणार संचारबंदी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 16:43 IST

अधिकाºयांच्या बैठकीत होतोय प्लॅन तयार; अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार

ठळक मुद्देसंचारबंदीकाळात सोलापुरात रेशन दुकाने पाच दिवस, दूध, वर्तमानपत्र वितरण, मेडिकल दुकाने सुरूच राहतीलसोलापूर शहर व संबंधित तालुक्यात ज्या गावांमध्ये संसर्ग आहे, त्या ठिकाणी चाचण्या करून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यावर भर दिला जाणारसध्या या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. आणखी इतर अधिकाºयांची मते जाणून सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार

सोलापूर : सोलापूर शहरासह कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात असलेल्या पाच तालुक्यातही संचारबंदी लागू करण्याचा अधिकाºयांचा प्रस्ताव आहे. सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित अधिकाºयांची शनिवारी दुपारी जिल्हा नियोजन सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त पी़ शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्यासह महसूल, पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग असलेल्या ठिकाणी संचारबंदी लागू करून रॅपीड किटद्वारे चाचणी घेण्याच्या प्रस्तावावर अधिकाºयांशी चर्चा केली. त्यावर सोलापूर शहराबरोबरच दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर या तालुक्यामधील गावामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाचे पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, त्या गावातही संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

संचारबंदीकाळात सोलापुरात रेशन दुकाने पाच दिवस, दूध, वर्तमानपत्र वितरण, मेडिकल दुकाने सुरूच राहतील, मात्र शहराबाहेरून दूध घेऊन येणाºयास प्रतिबंध राहणार आहे. सोलापूर शहर व संबंधित तालुक्यात ज्या गावांमध्ये संसर्ग आहे, त्या ठिकाणी चाचण्या करून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यावर भर दिला जाणार आहे, अशा पद्धतीने प्राथमिक स्तरावर असा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. इतके नियोजन करून ही बैठक संपवण्यात आली व शनिवारी सायंकाळी पुन्हा याच विषयावर वरील अधिकाºयांची बैठक होणार आहे. सध्या या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. आणखी इतर अधिकाºयांची मते जाणून सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद