शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शेतकºयांचे शोषण करणाºयांना ठेचून काढणार : सहकारमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 11:16 IST

सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू, प्रचाराला आला वेग, आरोप-प्रत्यारोपाची झाली सुरूवात

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी शेतकºयांचा घात केला : निंबर्गीआता प्रत्येक शेतकरी सोसायटी सभासद

सोलापूर : बाजार समितीच्या निवडणुकीत मी फक्त कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. ही निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणाचे परिवर्तन करणारी निवडणूक आहे. शेतकºयांचे शोषण करणाºया औलादींना मी ठेचून काढणार आहे. तुम्हीही या औलादींना दूर ठेवा, असे आवाहन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा प्रणित श्री सिद्धरामेश्वर परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ (हत्तूर ता. दक्षिण सोलापूर) येथील सोमेश्वर मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी झालेल्या प्रचारसभेत देशमुख बोलत होते. देशमुख म्हणाले, मी सुडाचं राजकारण केल्याचे विरोधक सांगत आहेत.

मी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. मी कुणालाही घाबरलेलो नाही. अश्विनी रुग्णालय कोणी उभे केले हे सर्वांना माहीत आहे. सुडाचं राजकारण करणारी ही औलाद आहे. माझ्या सहकारी मित्रांना दम देण्यात आला. व्यापारी माणसांनी दबक्या आवाजात मला विनंती केली. त्यानंतर हे रुग्णालय कोणी घेतले हे तुम्हाला माहीत आहे. या रुग्णालयाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना बोलावण्यात आले. मग कोण सुडाचं राजकारण करतंय, असा सवालही त्यांनी केला. माझे तीन पत्ते उघडू, अशी भाषा वापरण्यात आली. मी म्हणतो कराच. समाजाचे शोषण करणारी ही मंडळी आहेत.

गेल्या तीन वर्षांत मी कुणाला त्रास दिला का? माझ्या घराचा विषय काढण्यात आला. मी दोषी असेल तर कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे. पण मी बांगड्या भरलेल्या नाहीत. प्रास्ताविक हणमंत कुलकर्णी यांनी केले. यावेळी उमेदवारांची ओळख करुन देण्यात आली. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, बाबासाहेब आवताडे, माजी आमदार शिवशरण पाटील, शिवानंद दरेकर, डॉ. चंद्रशेखर हविनाळे यांची भाषणे झाली. दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील, संदीप टेळे, इंद्रजित पवार, रजनी भडकुंबे, श्रीमंत बंडगर, रामप्पा चिवडशेट्टी, अण्णाराव बाराचारे, काशिनाथ कदम यांच्यासह दक्षिण तालुक्यातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

पालकमंत्र्यांनी शेतकºयांचा घात केला : निंबर्गी- भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी म्हणाले, कुणी कुठली निवडणूक लढवावी याचे तारतम्य असते. पण पालकमंत्र्यांना ते राहिलेले नाही. तुम्ही भाजपाचे मंत्री असाल तर तुम्ही काँग्रेस आमदारांसोबतच्या बैठकीत निषेध करुन उठायला हवे होते. पण मी आणि माझा मुलगा कायम सत्तेत रहावे यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिलात. तुम्ही शेतकºयांचा घात करण्याचा प्रयत्न केलात, अशी टीकाही निंबर्गी यांनी पालकमंत्र्यांवर केली. गेल्या चार वर्षांत शेतकºयांच्या मालाला भाव मिळावा म्हणून आवाज उठविलात का? स्वत:च्या जागा सोडवून घेण्यासाठी तुम्ही व्यापाºयांच्या बाजूने बोलत आहात. काल एका माजी नगरसेवकाने आमचे मालक मताला पाच हजार रुपये मोजणार आहेत, अशी भाषा वापरली. कोणते मालक माहीत नाही. पैसा देऊन मते विकत घेणार असाल तर शेतकरी एवढा स्वस्त आहे का? असा सवालही त्यांनी केला. 

आता प्रत्येक शेतकरी सोसायटी सभासद- बाजार समितीत १ रुपयात जेवण देणारे झुणका भाकर केंद्र सुरु केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात याचा लाभ कुणी घेतला आहे का? हे कागदावरचे झुणका भाकर केंद्र आहे, असेही सहकारमंत्री देशमुख म्हणाले.  बाजार समितीत निवडणुकीचा अधिकार दिल्यानंतर प्रत्येक शेतकºयाला सोसायटीचा सभासद करुन घेणार आहे. त्याला कर्ज देण्याची जबाबदारी सोसायटीची असेल. 

पालकमंत्री कौरवांच्या बाजूने : पवारशहाजी पवार म्हणाले, पालकमंत्री आमचे नेते आहेत. ते जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत. महाभारतात कर्णाची महती होती. पण त्याने कौरवाची बाजू घेतली. कौरवाची बाजू घेतली तर काय होतंय हे आपण पाहिलं आहे. तेच आता होणार आहे. राजशेखर शिवदारे यांच्यावरही आरोप झाले. ते स्वाभिमानी आहेत. त्यांनी स्वाभिमानाने माघार घेतली. 

ते कोर्ट कचेरीत तरबेज, मताधिकार काढून घेतील- मागच्या विधानसभा निवडणुकीत कुणी कशी टिंगलटवाळी केली हे सर्वांना माहीत आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या साक्षीनेच शिवदारे आणि हसापुरे यांनी बाजार समितीतील भ्रष्टाचाराविरोधात तक्रार केली होती. याच आमदार साहेबांनी चंद्रकांतदादांना चौकशी करण्याची विनंती केली होती. ही माणसे कोर्ट कचेरीत तरबेज आहेत. ते कोर्टातून तुमचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतील, अशी मला भीती आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूक