शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

CoronaVirus News : हॉस्पिटलच्या भीतीने उशिरा दाखल, सरकारी रुग्णालयात परवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 01:45 IST

CoronaVirus News : कोरोनासोबतच सारीचे रुग्ण वाढ होत असल्याने मृत्यूमध्ये वाढ होते आहे.

समीर इनामदार सोलापूर: शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांचा अभाव आणि होणारी परवड पाहता रुग्णालयात जाण्यापेक्षा आजार घरीच अंगावर काढण्याची मानसिकता वाढल्याने सोलापुरात मृत्यूची संख्या वाढली. कोरोनासोबतच सारीचे रुग्ण वाढ होत असल्याने मृत्यूमध्ये वाढ होते आहे.सोलापुरात रविवारपर्यंत २१२६ इतके रुग्ण होते आणि मृतांची संख्या १८१ इतकी आहे. सोलापूरचा मृत्यू दर ८.५१ इतका आहे. १२ एप्रिल रोजी पहिला रुग्ण सापडला. त्याचे निदानही मृत्यूनंतर झाले. सोलापूरचे अधिकाधिक रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याचे त्यांच्या मृत्यूनंतर कळाले आहे. मृत्यूमुखी पडलेल्या अधिकांश रुग्णांची हिस्ट्री तपासल्यानंतर एकतर ते झोपडपट्टी परिसरातील किंवा ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता अधिक आहे, अशा परिसरातील आहेत. ५० पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांचे मृत्यू अधिक प्रमाणात झाले आहेत. यात अनेक श्रमिक मजुरांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या अनुसार अनेक कामगारांना असणारे फुफ्फुसाचे आजार, व्यसने आणि प्रदूषण ही देखील मृत्यूची कारणे आहेत.पॉझिटिव्ह आल्यानंतर शासकीय रुग्णालयात होत असलेली परवड, खासगी रुग्णालयांचे न भरतायेण्याजोगे बिल यामुळे दवाखान्यात जाण्यापेक्षा घरी मरण परवडले अशी स्थिती रुग्णांची झाली आहे. सारी म्हणून दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. माजी आमदार युन्नूसभाई शेख, अ‍ॅड. नेर्लेकर यांच्याबाबतीत हे म्हणता येईल. त्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा संसर्ग होतो की काय अशीही भीती अनेकांना आहे.>जिल्ह्यात सोमवारी नव्याने आठ जण पॉझिटिव्हसोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या करमाळा तालुक्यानेही सोमवारी खाते उघडले आहे. तालुक्यातील झरे येथे एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात सोमवारी नव्याने आठ रुग्ण दिसून आल्याने रुग्णसंख्या २०४ इतकी झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बोरगाव, सलगर, मैंदर्गी, करजगी येथील समावेश आहे.सोमवारी करमाळा तालुक्यातील झरे येथे एक रुग्ण आढळलो. यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले असून, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा उपयशी ठरत आहे.जिल्ह्यात सोमवारी १०७ रुग्णांचा अहवाल आला त्यात ८८ निगेटीव्ह तर आठ पुरूष रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. अशाप्रकारे १९६ रुग्णांची नोंद झाली होती, त्यात सोमवारी ८ रुग्णांची भर पडली आहे. अशाप्रकारे २०४ रुग्णसंख्या झाली असून, त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे.आज आढळलेले रुग्ण- अक्कलकोट, बुधवारपेठ:१. उल्हासनगर:२, बोरगाव:१, सलगर:१, करजगी:१, मैंदर्गी:१, करमाळा, झरे:१.