शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अंगावर आजार काढण्यामुळे सोलापुरात आॅक्टोबरमध्ये वाढले कोरोनाचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 13:23 IST

सोलापुरातील परिस्थिती; नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सोलापूर : कोरोनाची लक्षणे दिसताच रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्या या आवाहनाला अनेक सोलापूरकर प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. आॅक्टोबर महिन्यातील अनेक मृत्यू हे २४ तासांच्या आत झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला.

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यालयामार्फत शुक्रवारी अहवाल जारी करण्यात आला. यामध्ये उमा नगरी, आरटीओ परिसर, विजापूर रोड येथील दोन रुग्णांच्या मृत्यूचा संदर्भ देण्यात आले आहेत. अशक्तपणा, वास न येणे, चव न जाणवणे, सर्दी ही वरवर पाहता क्षुल्लक शारीरिक लक्षणे या दोन रुग्णांमध्ये होती. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे या रुग्णांच्या जीवावर बेतले आहे.

या रुग्णांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असा सल्लाही त्यांच्या खासगी डॉक्टरांनी दिला होता. तरीही हे रुग्ण घरी बसून राहिले आणि अचानक मृत्युमुखी पडले. शहरातील काही भागात नागरिक आपल्या घरी येणा?्या तपासणी पथकांना विरोध करतात. लक्षणे असून देखील स्वॅब टेस्ट देण्यास नकार देतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये संसगार्चा धोका वाढत आहे. लवकर निदान व उपचार केल्यास कोरोनावर मात करता येते. यापुढील काळात तरी नागरिकांनी उपचारास टाळाटाळ करु नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

सणासुदीच्या दिवसात नागरिकांनी काळजी घ्यावी...आॅक्टोबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू हे दवाखान्यात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत झाले आहेत. ही गंभीर बाब आहे. दिवस सणासुदीचे आहेत. लोक आता पुन्हा एकत्र येणार आहेत. या काळात आपण सर्वांनी एकमेकांची काळजी म्हणून फिजिकल डिस्टन्स पाळणे, अंगावर आजार न काढता तत्काळ रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे.- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका