शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शंभरीच्या उंबरठ्यावरील शेटफळच्या आजोबानं कोरोनाला हरवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:17 IST

करमाळा : वय वर्षे ९८.. तरीही तंदुरुस्त.. अन्‌ धडधाकट. पण अवचित क्षणी या आजोबांना कोरोनानं गाठलं. पण ते डगमले ...

करमाळा : वय वर्षे ९८.. तरीही तंदुरुस्त.. अन्‌ धडधाकट. पण अवचित क्षणी या आजोबांना कोरोनानं गाठलं. पण ते डगमले नाही. जगण्याची जबरदस्त आकांक्षा आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही रेमडेसिविर अथवा ऑक्सिजनचा टेकू न घेता त्यांनी कोरोनावर मात केली आहे. शेटफळचे प्रल्हाद रामचंद्र पोळ त्यांचं नाव.

शेटफळ (ना. ता. करमाळा) येथील प्रल्हाद रामचंद्र पोळ यांना लहानपणापासून व्यायामाची व वाचनाची आवड आहे. आजही ते नियमितपणे दररोज व्यायाम करतात. या वयातही त्यांना कोणताही आजार नाही. चष्म्याशिवाय पुस्तक व वर्तमानपत्रे वाचू शकतात. सर्व दातही अगदी मजबूत असल्याने स्वतः ऊस सोलून खातात. आजही शेतातील किरकोळ कामे व गुरे सांभाळण्याचे काम करतात.

शेतातील घरापासून दररोज नित्यनियमाने चालत गावात येऊन देवदर्शन करतात. मात्र, १५ एप्रिल रोजी त्यांच्या अंगात थोडासा ताप भरला. तोंडाला चव नसल्याने त्यांचा नातू ज्ञानेश्वर याने जेऊर येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले. लक्षणांवरून डॉक्‍टरांनी कोविड टेस्ट करण्यास सांगितले. टेस्ट पॉझिटिव्ह आली. घरच्या सर्वांना त्यांची काळजी वाटू लागली. उपचारासाठी खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. इतर टेस्ट नॉर्मल आल्या, तर स्कोअरही फार नव्हता, परंतु वय जादा असल्याने काळजी वाटत होती. डॉ. किरण मंगवडे, डॉ. संदीप नाईकनवरे, डॉ. हर्षवर्धन गायकवाड यांनी त्यांच्यावर उपचार केले. आणि त्यांनी कोरोनावर मात केली.

डाॅक्टरांनाच द्यायचे धीर

उपचार सुरू असताना मला काही होत नाही, तुम्ही काळजी करू नका, म्हणत खुद्द डॉक्‍टरांना व शेजारच्या इतर रुग्णांना धीर देण्याचे काम ते करत. दहा दिवस त्यांच्यावर कोविडचे नियमित उपचार केले. उपचाराला त्यांच्या शरीराने साथही दिली. रेमडेसिविर इंजेक्‍शन अथवा कृत्रिम ऑक्‍सिजनची गरजच त्यांना पडली नाही. आज ते ठणठणीत बरे होऊन घरी गृहविलगीकरणात आहेत. जवळचे नातेवाईक भेटायला आले, तर तुम्ही लांब अंतरावरच थांबा, हा आजार फार वाईट आहे, काळजी घ्या, मास्क लावा, असा सल्ला देतात.

फोटो

२८प्रल्हाद पोळ