२००७ मध्ये एका खुनाच्या प्रकरणातील जेवर काळे हा आरोपी आहे. खुनाच्या गुन्ह्यात त्याचे नाव आल्यानंतर तेव्हापासून तो फरार होता; पण तो गुरुवारी दुपारी नरखेड येथे आल्याची माहिती सीआयडीला मिळाली. यावरून पोलीस नरखेड येथे गेल्यानंतर आरोपी तेथे असल्याची खात्री पटली. आरोपीला संशय आल्यास तो तेथून पळून जाईल म्हणून पोलिसांनी वेशांतर केले आणि एक पोलीस डॉक्टर, दुसरा शिक्षक आणि तिसरा सहायक झालेल्या तिघांनी मिळून नरखेड गावातील काही लोकांची तपासणी करत त्यांच्या घराजवळ गेले. त्यांच्या घरातील लोकांची तपासणी केली. जेव्हा आरोपी जेवर हा समोर आल्यानंतर त्याची खात्री करून त्याच्यात कोरोनाचे लक्षण असल्याचे सांगितले. त्याला नरखेड येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यानंतर त्याची अॅन्टिजन टेस्ट करण्यास सांगितले. दरम्यान, सीआयडींनी मोहोळच्या पोलिसांना खबर दिली़ पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्याला पकडण्यात आले.
ही कामगिरी सीआयडीचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम, हवालदार शिवाजी अंकलगीकर, हाजीमलंग शेख यांनी केली.
इन्फो बॉक्स
...आणि त्याने हत्यार काढून ठेवले
जेव्हा पोलिसांनी आरोपी जेवर काळे याचे पोलिसांनी तापमान आणि पल्स तपासणी करून त्याच्यात कोरोनाचे लक्षण असल्याबाबतचे सांगून हॉस्पिटलमध्ये पुढील तपासणीसाठी येण्यास सांगितले़, तेव्हा आरोपीने आपल्या कंबरेला बांधलेले धारधार हत्यार घरीच काढून ठेवले़ त्यानंतर तो पोलिसांच्या सोबत हॉस्पिटलकडे आला. त्यामुळे त्याला सहजपणे पकडता आले.