शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त अध्यादेश : सोलापूर हद्दवाढ भागातील रस्ते बांधकाम खाते करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:22 IST

सोलापूर : महापालिका हद्दवाढ भागातील नागरी सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी शासनातर्फे देण्यात येणाºया विशेष सहाय्यमधून होणारी विकासकामे यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जातील असा दुरुस्ती अध्यादेश शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ११ एप्रिल रोजी जारी केला आहे. हद्दवाढ विभागासाठी शासनातर्फे दरवर्षी विशेष निधी दिला जातो. या निधीमध्ये मनपाचा हिस्सा घालून  कामे ...

ठळक मुद्देहद्दवाढ भागातील रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे देणे चुकीचेहा अधिकार मनपाकडेच ठेवणे उचित

सोलापूर : महापालिका हद्दवाढ भागातील नागरी सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी शासनातर्फे देण्यात येणाºया विशेष सहाय्यमधून होणारी विकासकामे यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जातील असा दुरुस्ती अध्यादेश शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ११ एप्रिल रोजी जारी केला आहे. 

हद्दवाढ विभागासाठी शासनातर्फे दरवर्षी विशेष निधी दिला जातो. या निधीमध्ये मनपाचा हिस्सा घालून  कामे यावर्षी सोलापूर महापालिकेला सुमारे २५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून कामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मनपाकडून कामांची यादी घेते. या निधीमध्ये मनपा आपला हिस्सा घालून हे प्रकल्प मार्गी लावते.

 प्रकल्पाचे टेंडर काढून ठेकेदारांकडून कामे करून घेणे, रस्त्यांची गुणवत्ता तपासणे ही कामे महापालिकाच करते. त्यामुळे रस्त्यांची गुणवत्ता चांगली राहण्यास मदत होते. पण आता पुन्हा पूर्वीप्रमाणेच शासनाने ही कामे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे देण्याचा फतवा काढल्याने मनपाचे प्रशासन अडचणीत आले आहे. त्यामुळे ही कामे होताना मनपा व सार्वजनिक बांधकाम खात्यात वादाचा विषय होण्याची चिन्हे आहेत. 

चार वर्षांपूर्वी सोलापूर महापालिकेच्या हद्दवाढ भागात विशेष निधीतून अशाच पद्धतीने सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत ४८ रस्ते करण्यात आले. या रस्त्यांच्या गुणवत्तेवर तत्कालीन विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांनी प्रश्न उपस्थित केला. याबाबत तक्रार केल्यावर तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी हे रस्ते हस्तांतरित करून घेण्यास नकार दिला.

या तक्रारीची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी घेतली. रस्त्यांचे थर्डपार्टी आॅडिट करण्यासाठी जिल्हा परिषदेतील अभियंते व वालचंद कॉलेजला थर्डपार्टी आॅडिटसाठी नियुक्त करण्यात आले. यासाठी महापालिकेने सुमारे साडेआठ लाख रुपये आॅडिट फी भरली. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारकिर्दीपासून हा अहवाल प्रलंंबित आहे. 

 हद्दवाढ भागातील रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे देणे चुकीचे आहे. यापूर्वीचा अनुभव वाईट आहे. या कामात मनपाचा हिस्सा असतो त्यामुळे हा अधिकार मनपाकडेच ठेवणे उचित होईल.- नरेंद्र काळे, माजी विरोधी पक्षनेता 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाpwdसार्वजनिक बांधकाम विभागgovernment schemeसरकारी योजना