मागील काही महिन्यांपासून तडवळ भागातील सीना-भीमा नदीतून वाळू पॉईंट लिलावाअभावी बंद होते. यामुळे तालुक्यातील प्रधानमंत्री, रमाई यासह विविध प्रकारच्या घरकुलांचा निधी उपलब्ध असूनही वाळूअभावी बांधकामे बंद होती. तसेच अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी या तिन्ही नगरपालिका क्षेत्रांतील कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. याशिवाय हजारो बंगल्याचे बांधकाम रखडलेले आहेत. परिणामी यावर अवलंबून असणाऱ्या हजारो मजुरांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.
अक्कलकोट महसूल कार्यालयाकडून १८ जानेवारी रोजी प्रभारी मंडळ अधिकारी राणा वाघमारे यांनी हा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. त्यामध्ये नदीचे नाव, तेथून मिळणारे एकूण ब्रास वाळू, त्याचे अंदाजित महसूल रक्कम नमूद करण्यात आली आहे.
कोट :::::::::::
वरिष्ठांच्या आदेशानुसार तडवळ भागातील सीना, भीमा नदीक्षेत्रातील १५ ठिकाणातील वाळू लिलाव करणे आवश्यक आहे. प्रत्येक पॉईंटवरील अंदाजित मिळणारी एकूण वाळू, त्यापासून शासनाला मिळणारा एकूण महसूल याचा सविस्तर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. यामधून २ अब्ज ४५ कोटी ९२ लाख ३३ हजार रुपयांचा शासनाला महसूल मिळणार आहे.
- राणा वाघमारे,
प्रभारी मंडळ अधिकारी