शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

बंडातात्या कराडकरांनाही संपवण्याचा रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:10 AM

मठाधिपतीपद देण्यासाठी विरोध केल्याने ह. भ. प. बंडातात्या कराडकर आणि ह. भ. प. जयवंत पिसाळ या दोघांना संपवण्याचा कट रचला होता.

पंढरपूर (जि. सोलापूर): मठाधिपतीपद देण्यासाठी विरोध केल्याने ह. भ. प. बंडातात्या कराडकर आणि ह. भ. प. जयवंत पिसाळ या दोघांना संपवण्याचा कट रचला होता. मात्र ह. भ. प. बंडातात्या कराडकर त्याठिकाणी नसल्याने त्यांचे प्राण वाचल्याची माहिती तपासात समोर आल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.वारकरी संप्रदाय आणि पालखी सोहळ्यात कराडकर दिंडीला मानाचे स्थान आहे. बंडातात्या कराडकर आणि जयवंत पिसाळ या दोघांनी माझ्यावर खोटेनाटे आरोप करुन मठाधिपतीपदावरून मला खाली खेचले. मठामध्ये कीर्तन करण्याची परवानगी देखील देत नव्हते. या अपमानाचा बदला म्हणून बंडातात्या अन् जयवंतला संपविण्याचा निर्णय घेतला होता, असे बाजीराव जगताप-कराडकर याने सांगितले.सोमवारी पुत्रदा एकादशीनिमित्त ह. भ. प. बंडातात्या आणि जयवंत पिसाळ हे दोघेही पंढरपूर मुक्कामी येणार हे बाजीराव जाणून होता. ही संधी साधून बाजीरावने मठामध्ये कीर्तन करण्याची परवानगी मागितली. परवानगी देण्यावरुन जयवंत महाराज आणि बाजीराव यांच्यात दशमीदिवशी वाद झाला. पण काही मंडळींनी मध्यस्थी करुन तो वाद मिटवला.या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बाजीरावने द्वादशीला दोघांना संपवण्याचा कट रचला होता. परंतु बंडातात्यांनी एक दिवस आधीच पंढरपूर सोडल्याने ते माझ्या तावडीतून सुटले अन् जयवंत पिसाळ एकटाच सापडला, अशी माहिती बाजीराव जगताप याने पोलिसांना दिली, असे अतुल झेंडे यांनी सांगितले.>पाच दिवसांची पोलीस कोठडीह. भ. प. जयवंत हिंदुराव पिसाळ (रा. लवंडमाची, ता. वाळवा, जि. सांगली) यांचा खून केल्याप्रकरणी बाजीराव जगताप याला बुधवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.