शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चपळगावात काँग्रेस-भाजपमध्ये लढत होणार

By admin | Updated: January 25, 2017 18:25 IST

चपळगावात काँग्रेस-भाजपमध्ये लढत होणार

चपळगावात काँग्रेस-भाजपमध्ये लढत होणारचपळगांव आॅनलाईन लोकमतअक्कलकोट तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागरूक असणारा गट म्हणून चपळगाव मतदारसंघाला ओळखले जाते. जिकडे चपळगाव मतदारसंघ तिकडे तालुक्याचे नेतृत्व असे समीकरण आजपर्यंत पाहावयास मिळत आले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे या मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने येथे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असले तरी आगामी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशी मैत्री करीत चपळगाव मतदारसंघात वर्चस्व निर्माण केले होते. परंतु जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढोबळे हे निवडून आल्यानंतर पाहिजे तेवढा वेळ मतदारसंघात देऊ शकले नाहीत. आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी या भागात कार्यकर्त्यांचे काही प्रमाणात जाळे उभे केले असले तरी उमेदवारी देताना त्यांना निश्चितच विचार करावा लागणार आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्येच थेट लढत होणार असल्याने इतर पक्षांना चांगलीच झुंज द्यावी लागणार आहे. आजवर चपळगाव मतदारसंघातील सदस्यांना सभापतीपद भोगता आले नाही. चपळगाव गणासाठी पंचायत समितीचे आरक्षण सर्वसाधारण आहे. त्यातच सभापतीपद सर्वसाधारण महिला असल्याने या ठिकाणी दोन्ही गटाकडून महिला उमेदवार देण्याचा विचार दोन्ही पक्षांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. -----------------------उमेदवारी कोणाला? चपळगाव गटासाठी उमेदवारीसंदर्भात दोन्ही पक्षांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी हे चपळगाव गटातील हन्नूर या गावचे असल्याने त्यांना या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठेसाठी प्रयत्न करावे लागतील. त्यांनी प्रत्येक गावातून उमेदवारांविषयी असणाऱ्या अपेक्षांची चाचपणी करत असून, आगामी निवडणुकांसाठी त्यांनी कंबर कसली आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा चपळगाव भागात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांनीही गुप्त बैठकांवर जोर दिला आहे.