शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

न्यायिक रिपोर्टवरील अभ्यासासाठी बार कौन्सिल आॅफ इंडियाची समिती

By admin | Updated: October 22, 2016 17:52 IST

अपघात विमा दावे घोटाळ्याच्या न्यायिक चौकशी अहवालाचा अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय बार कौन्सिल आॅफ इंडियाने घेतला आहे.

राजेश निस्ताने, ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. २२ -  अपघात विमा दावे घोटाळ्याच्या न्यायिक चौकशी अहवालाचा अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय बार कौन्सिल आॅफ इंडियाने घेतला आहे.
१६ आॅक्टोबर रोजी बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यात निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्या खरे यांनी केलेल्या चौकशी अहवालावर चर्चा झाली. या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी बार कौन्सिल आॅफ इंडियाचे सहअध्यक्ष अ‍ॅड. ठाकूर (हिमाचल प्रदेश) आणि अ‍ॅड.आर.बी. शहा (गुजरात) यांची समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती महिनाभरात आपला अहवाल सादर करणार आहे. 
शासनाच्या अधिपत्याखालील विमा कंपन्यांकडून दाव्याची लाखो रुपयांची रक्कम नुकसानभरपाई म्हणून उकळण्याचे प्रकार यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र सुरू आहे. अपघाताच्या वेळी अज्ञात वाहन एफआयआरमध्ये नमूद असताना नंतर केव्हा तरी अचानक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उभा करुन वाहन रेकॉर्डवर आणले जाते. त्याचे चालक-मालक २५ ते ५० हजारात ‘मॅनेज’ केले जातात. या रकमेसाठी ते अपघाताची जबाबदारी स्वत:वर घेतात. त्या आधारे २० लाखांपासून सव्वा ते दीड कोटीपर्यंत अपघात विमा दावा केला जातो. मृताबद्दल सहानुभूती म्हणून अपघात विमा प्राधिकरणही फार चिरफाड न करता दावे मंजूर करतात. त्याचाच फायदा घेऊन विमा कंपन्यांकडून सर्रास नुकसानभरपाईपोटी लाखोंच्या रकमा उकळण्याचा सपाटा सुरू होता. या प्रकरणात विमा कंपन्यांचे काही सर्वेअरही मॅनेज केले जातात. परंतु ‘लोकमत’ने भंडाफोड केल्याने आता अपघात विमा दाव्याची बहुतांश प्रकरणे सुक्ष्म पद्धतीने तपासली जात आहे. 
 
या मुद्यांवर होणार अभ्यास 
न्या. खरे यांचा रिपोर्ट ग्राह्य धरायचा की नाही, या अहवालावरून तपास सीबीआयकडे द्यायचा की सीआयडीकडे, एफआयआर सरकारने करावा, बार कौन्सिलने की न्यायालयाने आदी विविध मुद्यांवर ही समिती अभ्यास करणार आहे. 
 
‘लोकमत’ने केला भंडाफोड
अपघात विमा दावे घोटाळ्याचा ‘लोकमत’ने भंडाफोड केला आहे. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेऊन बार कौन्सिल आॅफ इंडियाने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश महाराष्टÑ-गोवा बार कौन्सिलला दिले होते. त्यानुसार निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्या खरे यांची नियुक्ती करण्यात आली. न्या. खरे यांनी अनेक महिने सखोल चौकशी करून अहवाल बार कौन्सिलकडे सादर केला. 
 
दीड कोटींची भरपाई विमा कंपनीऐवजी वाहन मालकाकडून
अपघात विमा दावे घोटाळ्याबाबत ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेमुळे अपघात विमा दावे प्राधिकरणही सजग झाले. या प्राधिकरणाचे दारव्हा (जि. यवतमाळ) येथील सदस्य तथा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए.व्ही. सेदानी यांनी सुमारे ४५ लाखांची नुकसानभरपाई ओरिएंटल इन्शोरन्स कंपनीऐवजी वाहन मालक-चालकाकडून वसूल करण्याचे निर्देश दिले. जावई व सासºयाच्या अपघाताच्या प्रकरणात विमा दावा मिळावा म्हणून बोगस वाहन, बोगस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उभे करण्यात आले होते. विमा कंपनीचे वकील अ‍ॅड. पी.टी. दर्डा यांनी हा बोगसपणा न्यायालयापुढे उघड केला. असाच दावा प्राधिकरणाच्या यवतमाळ येथील अध्यक्षांनी अपघात झाल्याचे कबूल करणाºया वाहन चालक व मालकावर उलटविला. तीन प्रकरणात सुमारे दीड कोटींची नुकसानभरपाई विमा कंपनीऐवजी चालक-मालकाकडून वसुलीचे आदेश दिले गेले. 
 
दोन सदस्यीय समिती गठित झाली असून त्यांच्या अहवालानंतरच कारवाईची पुढील दिशा निश्चित होणार आहे. 
- अ‍ॅड. सतीश देशमुख, उपाध्यक्ष, बार कौन्सिल आॅफ इंडिया.