शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक; वडापूर, मुळेगाव, वांगी येथील लोकांचे अहवाल आले निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 15:42 IST

दक्षिण सोलापूर तालुका; बक्षीहिप्परगे येथील ७० वर्षीय महिलेला झाली लागण

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात बुधवारी मंद्रुप, भंडारकवठे आणि बक्षीहिप्परगे येथे प्रत्येकी एक याप्रमाणे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायकवाड यांनी दिली.

मंद्रुप गावात आत्तापर्यंत ० रुग्ण होते. यापूर्वी आढळलेला एक पोलीस व डॉक्टराचा मुलगा मंद्रुपमध्ये राहावयास नव्हते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. पण दोन दिवसापूर्वी गावातील एका  ६९ वर्षीय वृद्धास सर्दी खोकला व ताप आल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्या वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मंद्रुप गावात आता खबरदारी घेण्यात येत आहे. गावामध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे समजताच बाजारपेठेतील दुकाने पटापट बंद करण्यात आली.

त्याचबरोबर भंडारकवठे येथील एका ६५ वर्षीय महिलेला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले असता तिचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बक्षीहिप्परगा येथील ७० वर्षाची वृद्धा यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिलाही लागण झाली आहे. विशेष म्हणजे ११४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्यामध्ये मुळेगाव येथील ४५ तसेच वांगी वडापूर, शंकरनगर, बसवनगर, कुंभारी, विडीघरकुल येथील ६० रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद