शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कुर्डूवाडीत स्वच्छतेचा होतोय जागर ! नगरपरिषदेचा उपक्रम : आठवडा बाजारातील कचरा रात्रीच उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:41 IST

नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण- २०१८ हे मिशन हाती घेतले असून, शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छतेचा जागर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक पथके कार्यरतनगरपरिषदेचे एक पाऊल पुढे तर शहरवासीयांनी दोन पावले पुढे टाकून सहकार्य करावे : समीर मुलाणीच्नगरपरिषदेकडून स्वच्छतेबाबत इंजिनिअर्स अ‍ॅप आणि स्वच्छता अ‍ॅप नागरिकांच्या सोयीसाठी

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुर्डूवाडी दि २३  : नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण- २०१८ हे मिशन हाती घेतले असून, शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छतेचा जागर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक पथके कार्यरत असून, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, दवाखाने, उद्योगधंदे आदी ठिकाणी पथकातील अधिकारी, कर्मचारी स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगणार असल्याचे मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.शहरात आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांच्या मार्गदर्शनाखाली खास नियोजन करण्यात आले असून, दिवसा रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून आठवडा बाजारातील कचरा रात्री ८ ते १० या वेळेत उचलला जाणार आहे. शहराचे मुख्य ५ विभाग करण्यात आले असून, या भागासाठी दोन मुकादम नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या निरीक्षणात सर्व मुख्य रस्ते, उपरस्ते झाडण्यात येत आहेत. स्वच्छ शहर सर्वेक्षण २०१८ मध्ये शहरातील ५ वॉर्डात ५ घंटागाड्या प्रत्येक गाडीत एक कर्मचारी व चालक यांची नेमणूक करण्यात आली आहे. सुका व ओला कचरा याचेही नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी, व्यावसायिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करुन दिला नाही तर तो कचरा स्वीकारणार नाही, असेही मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी सांगितले.------------------------------स्वच्छता अ‍ॅप कार्यरतच्नगरपरिषदेकडून स्वच्छतेबाबत इंजिनिअर्स अ‍ॅप आणि स्वच्छता अ‍ॅप नागरिकांच्या सोयीसाठी कार्यान्वित करण्यात आले असून, या अ‍ॅपवरच नागरिकांनी आपल्या भागातील तक्रारी, समस्या फोटो व नावासह दाखल करु शकतात. त्यानंतर या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गावडे म्हणाले.----------------------------नगरपरिषदेचे एक पाऊल पुढे तर शहरवासीयांनी दोन पावले पुढे टाकून सहकार्य करावे. स्वच्छतेच्या मिशनमध्ये नगरपरिषदेने यशस्वी होण्याचा आणि प्रथम तीन क्रमांकात येण्याचा निर्धार केला आहे. यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी, युवक-युवती, महिला, उद्योजक, डॉक्टर आदींनी सहकार्य करावे. साºयांनी ‘स्वच्छ कुर्डूवाडी-सुंदर कुर्डूवाडी’चा संकल्प करावा. -समीर मुलाणी, नगराध्यक्ष

टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान