शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

जळत्या चितेच्या साक्षीनं ‘स्वच्छता विधी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 14:02 IST

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम : इतकेच मला झाडताना, सरणालागुनि कळले होते.. झाडूंनी केली सुटका, कचºयाने छळले होते..

ठळक मुद्देसकाळी ७ पासून १0.३0 पर्यंत १२५ ते १५० सदस्यांनी पावसाची पर्वा न करता संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता केलीकोणताही साधक थकत नव्हता किंवा बसत नव्हता, जेवढं शक्य होईल तेवढ्या क्षमतेने स्वच्छता करीत होताअंत्यविधीनंतर त्याच ठिकाणी टाकण्यात आलेल्या तिरड्या, हार, फुले, कपडे, गादी, उशा आदी साहित्य साधक गोळा करत होते

सोलापूर : जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस जगाचा निरोप घेणारच... शनिवारी रात्री अंत्यसंस्कार केलेली चिता सकाळपर्यंत जळत होती. एकीकडे चिता जळत असताना दुसरीकडे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य कठड्याखाली व आजूबाजूला पडलेली राख आणि कचरा गोळा करीत होते. सकाळी ७ पासून १0.३0 पर्यंत १२५ ते १५० सदस्यांनी पावसाची पर्वा न करता संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता केली. 

शहर उत्तरमध्ये मृत्यू होणाºया सर्व जाती-धर्माच्या लोकांचा अंत्यविधी जुना पुणे नाका येथील बाळे स्मशानभूमीत केला जातो. ५ ते ६ एकरातील स्मशानभूमीत सध्या प्रेतांना जाळून अंत्यसंस्कार केला जातो. आजूबाजूच्या परिसरात अनेक मृतदेह जमिनीमध्ये पुरण्यात आले आहेत. स्मशानभूमीत मृतदेह पुरण्यात आलेल्या जागेत काटेरी झुडपे तयार झालेली होती. साधकांनी डोक्यावरच्या पावसाचा विचार न करता स्वत:सोबत आलेल्या दातºया व कुºहाडीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली.

थडग्यांवरील काटेरी झुडपे व वेली काढत साधकांनी एकमेकांच्या सहायाने स्वच्छता केली. लहान-मोठे वृक्ष कुºहाडीने तोडून बाहेर काढले. काढलेली काटेरी झाडे गोळा करून ती एका ठिकाणी ठेवली जात होती. अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाºया गवºयांचा भुगा गोळा केला जात होता. जमा केलेला कचरा साधक दोघा- तिघांच्या मदतीने महापालिकेच्या कचरा गाडीत टाकत होते. 

कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही.  फार झालं तर एखादी दुसरी सूचना सहकाºयाला केली जात होती; मात्र कोणी कोणाला आदेश देणार नाही. घाण आहे असे लक्षात आले की तो साधक स्वत:हून पुढे होऊन स्वच्छता करीत होता. स्मशानभूमीतील कडेकोपरे, भिंती, बसण्याचे ठिकाण सर्व ठिकाणं कार्यकर्त्यांनी वाटून घेतली होती. अंत्यविधीनंतर त्याच ठिकाणी टाकण्यात आलेल्या तिरड्या, हार, फुले, कपडे, गादी, उशा आदी साहित्य साधक गोळा करत होते. कोणताही साधक थकत नव्हता किंवा बसत नव्हता, जेवढं शक्य होईल तेवढ्या क्षमतेने स्वच्छता करीत होता. पाहता पाहता संपूर्ण स्मशानभूमी साधकांनी चकाचक केली आणि पुढच्या स्मशानभूमीकडे आपला मोर्चा वळवला. 

- स्मशानभूमी - 11- सदस्य संख्या - 3300- मिनिटे मोहीम - 330- टन कचरा- 140- 16 टन दगडं

टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान