शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिल हॉस्पिटलने विचारला सल्ला; संचालनालयाने मागितला उलट खुलासा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 13:10 IST

रोजंदारी कर्मचाºयांचे नियुक्ती प्रकरण: सल्ला मागण्याचे कारणही विचारले

ठळक मुद्देकायम कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे  रोजंदारी कर्मचारी कोविड ब्लॉकमध्ये सहा महिन्यापासून जीव धोक्यात कोविडच्या काळात विम्याचे संरक्षण मिळावे म्हणून स्थानिक प्रशासनाने १२० रोजंदारी कर्मचाºयांची यादी संचालनालयास सादर केली होती

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) वर्ग चारची पदे भरण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या काम करत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांच्या नियुक्तीबाबत सिव्हिल प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला मार्गदर्शन करण्याबाबत विचारणा केली होती. यावर मार्गदर्शन करणे तर दूरच उलट मार्गदर्शन का करायचे याबाबत सिव्हिलनेच खुलासा करावा, असे पत्र संचालनालयाने सिव्हिलला पाठवले आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागात संपूर्ण महाराष्ट्रात वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतची संपूर्ण रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार आहेत. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वर्ग चारची १४५ पदे रिक्त आहेत. स्थानिक प्रशासनाने रोजंदारी कर्मचाºयांना रिक्त पदावर सामील घेण्यासंदर्भात १९ जुलै रोजी संचालक यांना मार्गदर्शन मागविले होते.  या पत्रात रुग्णालयातील रोजंदारी कर्मचाºयांनी दाखल केलेल्या याचिकेतील अंतरिम आदेशाचा आपण पद भरण्याबाबत विचार करावा, जेणेकरून भविष्यात अडचणी निर्माण होणार नाही असा उल्लेख केला होता.

रोजंदारी कर्मचाºयांना कामावर घेताना शासनाची अथवा संचालनालयाची परवानगी घेण्यात आली होती काय? जर यांना नियुक्ती आदेश दिले असेल तर आता संचालनालयाचे मार्गदर्शन मागविण्याचे प्रयोजन काय? याचा खुलासा तत्काळ संचालनालयास सादर करावा, असे उलट पत्र स्थानिक प्रशासनाला पाठवले आहे. 

जीव धोक्यात घालून काम करताना खुलासा का नाही मागितला मागील १० वर्षांपासून १२० रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. कोविडच्या काळात विम्याचे संरक्षण मिळावे म्हणून स्थानिक प्रशासनाने १२० रोजंदारी कर्मचाºयांची यादी संचालनालयास सादर केली होती. कायम कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे  रोजंदारी कर्मचारी कोविड ब्लॉकमध्ये सहा महिन्यापासून जीव धोक्यात घालून विनावेतन रुग्णसेवा देत आहोत. हे सगळे होत असताना खुलासा मागितला नाही मग आत्ताच का खुलासा मागत आहात असा सवाल रोजंदारी कर्मचारी संघटनेने केला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटल