शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

‘शहर मध्य’च्या मताधिक्याने सारेच बुचकळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 13:22 IST

सोलापूर लोकसभा निवडणुक विश्लेषण; आमदार प्रणिती शिंदे यांनी होम टू होम भेटी दिल्या. विविध कार्यक्रमांमधून लोकांच्या संपर्कात राहिल्या. तरीही निवडणूक निकाल धक्कादायक ठरले आहेत. 

ठळक मुद्देभाजपला या मतदारसंघात अनपेक्षितपणे मिळालेले मताधिक्य पाहून काँग्रेसबरोबर भाजप नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले शहर मध्यमध्ये काँग्रेसचे ४, राष्ट्रवादीचे २, सेनेचे २ आणि भाजपचे १४ नगरसेवक आहेतनीलमनगर, आकाशवाणी, विनायकनगर या प्रभागातून भाजपला ११ हजार ७९३ तर काँग्रेसला फक्त १५८८ इतके मतदान झाले

राजकुमार सारोळे

सोलापूर - काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या भागात भाजपच्या उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना  शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमधून मताधिक्य मिळाले. शहर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या करीत आहेत. निवडणूक प्रचारात त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत होम टू होम भेटी दिल्या.  विविध कार्यक्रमांमधून लोकांच्या संपर्कात राहिल्या. तरीही निवडणूक निकाल धक्कादायक ठरले  आहेत. 

काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांच्या प्रभागात पाटील चाळ, जुनी मिल चाळ, एनजी मिल चाळ, जैनुद्दीन चाळ, क्लार्क चाळ या परिसरातून भाजपला ३८३९ तर काँग्रेसला २४८३ इतके मतदान झाले आहे. जेलरोड, विजापूर वेस परिसरात भाजपला १३२६ तर काँग्रेसला ३३१० इतके मतदान झाले आहे. दाजीपेठ, दत्तनगर, फलमारी झोपडपट्टी या ठिकाणी भाजपला ४२५७ तर काँग्रेसला २४०५ इतकी मते मिळाली आहेत. व्यंकटेश्वर झोपडपट्टी, कुचननगर, कर्णिकनगर, शासकीय तंत्रनिकेतन परिसरातही भाजपला चांगले मताधिक्य मिळाले आहे. 

काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे जनवात्सल्य हे निवासस्थान असलेल्या सोलापूर सोसायटी, सातरस्ता, गांधीनगर, विकासनगर, आयकर सोसायटी, महिला हॉस्पिटल, केशवनगर पोलीस वसाहत या भागात भाजपला मताधिक्य आहे.

 भाजपला ३१३६ तर काँग्रेसला २५५९ इतकी मते मिळाली आहेत. त्यानंतर शानदार चौक, मौलाली चौक, शास्त्रीनगर, मोदी परिसरात काँग्रेसला बºयापैकी मतदान झाले आहे. या भागाचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल या करतात. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या प्रभागात आंबेडकर प्रशाला, कोनापुरे चाळ येथून काँग्रेसला बºयापैकी मतदान झाले आहे.  एकंदरीत कल पाहता सारेच बुचकळ्यात पडले आहेत.

काय आहे परिस्थितीशहर मध्यमध्ये काँग्रेसचे ४, राष्ट्रवादीचे २, सेनेचे २ आणि भाजपचे १४ नगरसेवक आहेत. नीलमनगर, आकाशवाणी, विनायकनगर या प्रभागातून भाजपला ११ हजार ७९३ तर काँग्रेसला फक्त १५८८ इतके मतदान झाले आहे. या ठिकाणी भाजपचे नगरसेवक श्रीनिवास करली, अनिता कोंडी, वरलक्ष्मी पुरूड, सेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर हे प्रतिनिधित्व करतात. मोदी, रामवाडी, लिमयेवाडी या परिसरातून भाजपला २२०७ तर काँग्रेसला २६९२ इतकी मते मिळाली आहेत.

नगरसेवकांना वाटते आश्चर्यभाजपला या मतदारसंघात अनपेक्षितपणे मिळालेले मताधिक्य पाहून काँग्रेसबरोबर भाजप नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नागेश वल्याळ म्हणाले, या मतदारसंघातून पाच हजारांची लीड देतो, असे म्हणाल्यावर आमचे नेते हसले होते. काँग्रेसला बालेकिल्ल्यात लीड कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. पण इतके मताधिक्य पाहून मला आश्चर्य वाटत आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक मेघनाथ येमूल म्हणाले, प्रचारात मी घरोघरी फिरलो, पण झोपडपट्टीतून भाजपला मागील वेळेपेक्षा जास्त मतदान कसे झाले याचे आश्चर्य वाटत आहे. नगरसेवक विनोद भोसले, चेतन नरोटे म्हणाले, मी जिथे राहतो तेथे भाजपला जास्त मतदान कसे होईल. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९solapur-pcसोलापूर