आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि २३ : गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेत शहरातील मैलामिश्रीत पाणी मिसळते़ याबाबत अनेकवेळा निवेदने दिल्यानंतरही फरक न पडल्याने विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या २०० कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना घेराव घालून याचा जाब विचारला़ तसेच यानंतरही चंद्रभागेत मिसळणारे मैलामिश्रीत घाण पाणी बंद न झाल्यास त्याच घाण पाण्याने स्नान घालण्याचा इशाराही देण्यात आला.चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणासाठी राज्य सरकारने नमामी चंद्रभागा योजना जाहीर केली खरी पण अद्याप ही योजना केवळ कागदावरच आहे. स्थानिक प्रशासनाकडून चंद्रभागेच्या पात्राच्या स्वच्छतेबाबत व पाणी स्वच्छ ठेवण्याबाबत दुर्लक्ष केले जाते़ त्यामुळे चंद्रभागेच्या पात्रात कायमच घाण असते. पंढरपूर शहरातून येणाºया गटारीचे व काही ठिकाणी भुयारी गटार योजनेचे ओव्हर फ्लो झालेले पाणी मिसळले जाते़ त्यामुळे चंद्रभागेचे पाणी अधिकच दूषित होते. याबाबत अनेकवेळा मुख्यमंत्र्यांपासून विविध अधिकाºयांना निवेदने दिली; मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही़ त्यामुळे पंढरपुरातील वारकरी व हिंदुत्ववादी संघटना एकत्रित जमून मुख्याधिकाºयांना त्यांच्याच कक्षात घेराव घालून जाब विचारला़ त्यानंतर निवेदन दिले. यावेळी वारकरी संप्रदाय पाईक संघटना, हिंदू महासभा, महर्षी वाल्मीक संघटना, विश्वहिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, अ़ भा़ ग्राहक पंचायत, हिंदू जनजागृती समिती, हिंदू विधिज्ञ परिषद, सनातन संस्था, पेशवा युवा मंच, परशुराम मित्र मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवप्रतिष्ठान, राष्ट्रीय नाभिक महासंघ, विद्यार्थी परिषद, विश्व वारकरी सेना, संकल्प प्रतिष्ठान, हिंदवी प्रतिष्ठान, दुनियादारी प्रतिष्ठान, वनवासी कल्याण आश्रम या पंढरपुरातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़ --------------------------विठ्ठलाबरोबर चंद्रभागाही श्रद्धास्थानश्रीविठ्ठलाच्या बरोबरीनेच चंद्रभागा नदी ही आमचे श्रद्धास्थान आहे़ यातील घाण व दुरवस्था वारकरी इतके दिवस सहन करीत आला; मात्र आता आम्ही हे सहन करणार नाही़ त्यासाठी वारकरी संघर्ष करण्यास तयार आहे़ प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व वारकºयांच्या संयमाची परीक्षा बघू नये़, अशी भावना वारकरी संप्रदाय पाईक संघाचे सदस्य ह. भ. प. देवव्रतमहाराज वासकर यांनी व्यक्त केली.
पंढरपूरातील चंद्रभागेतील मैलामिश्रित पाणी प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मुख्याधिकाºयांना घातला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 15:03 IST
गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेत शहरातील मैलामिश्रीत पाणी मिसळते़ याबाबत अनेकवेळा निवेदने दिल्यानंतरही फरक न पडल्याने विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या २०० कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना घेराव घालून याचा जाब विचारला़
पंढरपूरातील चंद्रभागेतील मैलामिश्रित पाणी प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मुख्याधिकाºयांना घातला घेराव
ठळक मुद्देचंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणासाठी राज्य सरकारने नमामी चंद्रभागा योजना जाहीर केली खरी पण अद्याप ही योजना केवळ कागदावरच आहेस्थानिक प्रशासनाकडून चंद्रभागेच्या पात्राच्या स्वच्छतेबाबत व पाणी स्वच्छ ठेवण्याबाबत दुर्लक्ष केले जाते़चंद्रभागेच्या पात्रात कायमच घाण असते. पंढरपूर शहरातून येणाºया गटारीचे व काही ठिकाणी भुयारी गटार योजनेचे ओव्हर फ्लो झालेले पाणी मिसळले जाते़