आप्पासाहेब पाटील
सोलापूर : दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या मुद्द्यांवर बोट ठेवत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आज पुन्हा विरोधकांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. मात्र कोणत्या विषयाची तक्रार कोणाकडे हे माहिती नाही, कायदा काय आहे हे माहिती नाही, कोणत्या निवडणुका कोणत्या निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली चालतात हेही माहिती नसलेले विरोधक मागील दोन दिवसापासून मतदारयाद्याबाबत शंका उपस्थित करणारे विरोध म्हणजे 'फियास्को' आहेत अशी सणसणीत टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "इतके कन्फ्युज विरोधक माझ्या जीवनात पाहिले नाही. कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे या गोष्टी विरोधकांना माहिती नाहीत. केवळ पर्सेप्शन क्रिएट करण्याकरिता म्हणजेच निवडणुकीत आपण हरलो त्यापूर्वीच ते पर्सेप्शन क्रिएट करताहेत. विरोधक काल राज्याचे निवडणूक अधिकारी आहेत त्या चोक्कलिंगम यांच्याकडे गेले होते. चोक्कलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काहीच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी वेगळे निवडणुक निर्णय अधिकारी आहेत. निवडणुक यादी अंतिम करण्यापूर्वी हरकती मागविल्या जातात, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी जायायला पाहिजं होतं, तेव्हाच तक्रार करायला हवी होती, मात्र तेव्हा तक्रार, हरकत न घेता आता काही तरी नरेटिव्ह पसरविण्यासाठी विरोधकांकडून मतदार याद्यात घोळ असल्याचे पुढे केलं जात आहे हे हास्यास्पद आहे."
विरोधकांच्या या हास्यास्पद गोष्टी समोर येत असल्यानेच आज शरद पवार हे त्यांच्यासोबत गेले नसल्याचेही फडणवीस म्हणाले.
Web Summary : CM Fadnavis refuted opposition's voter list fraud claims as a 'fiasco,' citing their ignorance of election procedures. He highlighted their late complaints and clarified Sharad Pawar's absence, attributing it to the opposition's laughable actions. The CM emphasized the importance of timely objections with evidence.
Web Summary : सीएम फडणवीस ने विपक्ष के मतदाता सूची धोखाधड़ी के दावों को 'फिस्को' बताया, चुनाव प्रक्रियाओं के बारे में उनकी अज्ञानता का हवाला दिया। उन्होंने उनकी देर से शिकायतों पर प्रकाश डाला और शरद पवार की अनुपस्थिति को स्पष्ट किया, इसे विपक्ष की हास्यास्पद हरकतों के लिए जिम्मेदार ठहराया। सीएम ने सबूत के साथ समय पर आपत्तियों के महत्व पर जोर दिया।