शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पिंजºयात मगरीसाठी चिकन तर बिबट्याला जिवंत शेळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:19 IST

देगाव नाल्यात लावल्या जाळ्या; मगर व बिबट्याचा शोध सुरूच

ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून मोहोळ आणि करमाळा तालुक्यात हैदोस  माजविणाºया बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून पिंजºयाची व्यवस्था मगरीला फिरण्यासाठी मोठा परिसर असल्याने तिला पकडणे थोडे अवघड जाणार आहे

सोलापूर : सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ‘पिंजरा’ प्रचंड गाजत आहे. सोलापूर शहरातील देगावच्या नाल्यावर मगरीसाठी तर मोहोळ तालुक्यातील शिवारात बिबट्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बिबट्याला आमिष म्हणून जिवंत शेळी तर मगरीला आमिष म्हणून सडलेले चिकन ठेवण्यात आले आहे.

 देगाव परिसरातील मगर पकडण्यासाठी वनविभागातर्फे  प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांच्या विनंतीवरून पुण्यातील ‘रेस्क्यू’ या संस्थेतील सात जणांचे पथक सोलापुरात आले आहे. या पथकाने देगाव नाला परिसराची पाहणी केली. तसेच तिथे चार जाळ्या व एक पिंजराही लावण्यात आला आहे.

मगरीला फिरण्यासाठी मोठा परिसर असल्याने तिला पकडणे थोडे अवघड जाणार आहे. यामुळे एका विशिष्ट परिसराच्या बाहेर मगर जाऊ नये, यासाठी पथकातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी नाल्यामध्ये चार ठिकाणी जाळ्या लावण्यात आल्या आहेत, त्यामुळे मगर पलीकडे जाणार नाही. त्याच परिसरात मगर पकडण्यासाठी एक पिंजराही लावण्यात आला आहे. 

पिंजºयामध्ये मगर यावी, यासाठी तिथे मांसाचे तुकडे ठेवण्यात आले आहेत. मगर ही वासाने आकर्षित होते. पिंजºयामध्ये सडलेले मांस ठेवल्यास त्याच्या उग्र वासाने मगर पिंजºयात येईल,  हा यामागचा उद्देश आहे. पिंजºयामध्ये एक किलो कोंबडीचे मांस एका हुकाला लावण्यात आले आहे. मगर पिंजºयात येऊन मांस खाण्यासाठी चिकनला ओढेल. या दरम्यान हुकद्वारे पिंजºयाचा दरवाजा आपोआप बंद होऊन मगर अडकू शकते. 

जाळी लावण्यासाठी पथकाने बोटीची मदत घेतली. दिवसभर हे पथक देगाव परिसरातच होते. यादरम्यान त्यांना मगर दिसली. मगर नेमकी कोणत्या परिसरात फिरू शकते याचा अंदाज घेऊन पथकाने जाळी आणि पिंजरा लावला आहे. या कामात नागरिकांचा अडथळा होऊ नये म्हणून वन विभागाचे कर्मचारी परिसरात तैनात करण्यात आले आहे, असे वन परिमंडळ अधिकारी चेतन नलावडे यांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून मोहोळ आणि करमाळा तालुक्यात हैदोस  माजविणाºया बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून पिंजºयाची व्यवस्था केली आहे. मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे पवार वस्तीवर पिंजरा लावण्यात आला आहे. बिबट्या या पिंजºयाकडे आकर्षित व्हावा, यासाठी आतमध्ये त्याची शिकार म्हणून शेळीला ठेवण्यात आले आहे. भक्ष्याच्या निमित्ताने तो पिंजºयाकडे आकर्षित व्हावा, या दृष्टीने ही व्यूहरचना आखली असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Solapurसोलापूर