शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
2
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
3
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
4
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
5
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
6
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
7
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
8
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
9
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
10
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
12
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
13
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
14
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
15
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
16
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
17
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
18
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
19
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
20
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद

विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:04 IST

रासायनिक लेपनास मंदिर महासंघ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध आहे.

पंढरपूर :  "अल्पावधीत रासायनिक लेपन परत करावे लागल्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेल्या रासायनिक लेपनास मंदिर महासंघ, वारकरी यांचा तीव्र विरोध आहे," अशी भूमिका मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी मांडली आहे.

श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरे तर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले. ते करण्यात आले तेव्हाच पुढे ८ ते १० वर्ष त्याला काही होणार नाही, असे सांगण्यात आले होते. असे होते, तर ४ वर्षापूर्वीच लेपन केलेले असताना ते परत परत का करावे लागते? लेपन ४ वर्षांतच करावे लागते याचा अर्थ 'यापूर्वीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले', असेच म्हणावे लागेल. खरे पहाता देवतेच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारे रासायनिक लेपन करणे, ही पूर्णतः धर्मशास्त्रविसंगत कृती आहे. मुळापासून उपाययोजना न काढता रासायनिक लेपनासारखी वरवरची उपाययोजना काढल्याने देवतेच्या मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात, हेही ध्यानात घ्यायला हवे. त्यामुळे रासायनिक लेपनास मंदिर महासंघ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध आहे.

अशाच प्रकारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर वर्ष २०१५ मध्ये मूर्तीवर वज्रलेपनाची प्रक्रिया केली होती. नंतर जेमतेम २ वर्षातच देवीच्या मूर्तीवरील लेप निघायला आरंभ झाला. मूर्तीवर पांढरे डाग पडायला लागले आणि मूर्तीची झीज होतच राहिली. हिंदू जनजागृती समितीने या रासायनिक प्रक्रियेला विरोध करूनही धर्मसंमत नसलेले हे रासायनिक लेपन भाविकांवर लादले गेले. मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्यापूर्वी मंदिरे समितीने 'गतवेळच्या लेपनाचा अहवाल घोषित करावा, तसेच ज्यांनी हे लेपन केले त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही घनवट यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी