शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'जय जांबमुनी' म्हणत एकत्रीत आले; डीजेवर तालावर मिरवणूक काढली 

By काशिनाथ वाघमारे | Updated: December 22, 2023 18:45 IST

प्रथमत: आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते जांबमुनी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयघोष करण्यात आला.

सोलापूर : फुलांनी सजलेली बग्गी..लक्ष वेधून घेणारी जांबमुनी महाराजांची पंचधातुची मूर्ती..फेटे बांधलेल्या पुरुष-महिला कार्यकर्ते..जय जांबमुनी म्हणत सारे एकत्रित येत डीजेच्या तलावर थिरकत मिरवणूक काढली. चौका-चौकात या मिरवणुकीचे स्वागत झाले.मोची समाजाचे दैवत आदी जांबमुनी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात मध्यवर्ती लष्कर मंडळासह ३२ मंडळांनी शुक्रवारी दुपारी १ वाजता रेल्वे स्टेशन परिसरात महात्मा गांधी पुतळा येथून ही मिरवणुक काढली. या मिरवणुकीत मोदीपरिसरातील ८ मंडळं, लष्कर परिसरातील १५ मंडळं, फॉरेस्ट परिसरतील २ आणि निराळेवस्ती, उपलपवस्ती, पाच्छापेठ, मोदी, कुमठा नाका परसरातून जवळपास ३२ मंडळांनी सहभाग नोंदवला.

प्रथमत: आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते जांबमुनी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयघोष करण्यात आला. यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार नरसय्या आडम, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत, प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, सरस्वती कासलोलकर, माेची समाजाचे शहर व जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे, युवक अध्यक्ष रविकांत कमलापुरे, माजी महापौर संजय हेमगड्डी, रथोत्सव अध्यक्ष रविंद्र आसादे, नागनाथ कोसलोलू, सिद्राम कामाटी, बसवराज म्हेत्रे, नरसिंह आसादे, हणमंतु सायबोळू, नरगसेविका वैष्णवी करगुळे, माजी नगरसेविका मिनाक्षी कंपली, आशा म्हेत्रे, शुभांगी लिंगराज, श्रीनिवास म्हेत्रे यांच्यासह असंख्य समाजबांधवांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला.दहा मंडळांचे देखावे...

या मिरवणुकीत जवळपास दहा मंडळांनी देखावे सादर केले होते. या मिरवणुकीत कोनापुरे चाळीतील बाबा ग्रुपच्या वतीने अमरनाथ गुफा कंटेनरवर साकारली. फिरत्या देखाव्यात चौका-चौकात थांबून भगवान शंकर आणि बर्फातील लिंग यांचे दर्शन सर्वसामान्यांनी घेतले. लष्करमधील काही मंडळांनी रामायण आणि महाभारतातील संदर्भांवर देखावे सादर केले.

टॅग्स :Solapurसोलापूर