शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

शिवजयंतीनिमित्त सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल; निराळे वस्तीमार्गे शहरात प्रवेशाचा पर्याय

By appasaheb.patil | Updated: February 14, 2023 13:51 IST

शहरात १५ ते १९ फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते.

सोलापूर : शहरात १५ ते १९ फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते. १८ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवजन्मोत्सव पाळणा कार्यक्रम होणार आहे. तर १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल केला जाणार असून त्यासंबंधीचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी काढले. दरम्यान, जुना पुणे नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणारा मार्ग बंद करण्यात येणार असून निराळे वस्तीमार्गे शहरात प्रवेशाचा पर्याय पोलिसांनी उपलब्ध करून दिला आहे. 

शिवजयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी (ता. १८) सायंकाळी सहा ते गुरुवारी (ता. १९) पहाटे एक वाजेपर्यंत शिवजन्मोत्सव पाळणा कार्यक्रम होणार आहे. त्या दिवशी श्री छत्रपती संभाजीराजे चौक (जुना पूना नाका) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सम्राट चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, निराळे वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, तरटी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या मार्गावरील वाहनांसाठी जुना पूना नाका ते अॅम्बेसिडर हॉटेलजवळून निराळे वस्तीमार्गे कल्पना कॉर्नर तर सम्राट चौक-बाळीवेसमार्गे टिळक चौक ते पुढे आणि निराळे वस्ती ते कल्पना कॉर्नरमार्गे पुढे मेकॅनिक चौक ते कल्पना कॉर्नरमार्गे पुढे अशी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

मिरवणुकीमुळे १९ फेब्रुवारीला पर्यायी मार्गछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने १९ फेब्रुवारीला शहरातून भव्य मिरवणूक निघणार आहे. या पार्श्वभूमीवर डाळिंबी आड येथून शिंदे चौक, सरस्वती बुक डेपो, नवी पेठ, पारस इस्टेट, मेकॅनिक चौक, पांजरपोळ चौक, तरटी नाका पोलिस चौकी, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, कसबा चौक, खाटीक मशीद, दत्त चौक, राजवाडे चौक, जुने विठ्ठल मंदिर, चौपाड ते डाळिंबी आड हा मार्ग त्या दिवशी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

हे पर्यायी मार्ग....या मार्गावरील वाहनधारकांसाठी सात रस्ता, मोदी पोलिस चौकी, रेल्वे स्टेशन, भैया चौक, कल्पना कॉर्नर, निराळे वस्ती, अॅम्बेसिडर हॉटेलजवळून एसटी स्टॅण्ड किंवा जुना पूना नाका असा पर्यायी मार्ग असेल. तसेच सात रस्ता, रंगभवन चौक, सिव्हिल चौक, पोटफाडी चौक, व्हिको प्रोसेस, शांती चौक, जुना बोरामणी नाका, मड्डी वस्ती, जुना तुळजापूर नाकामार्गे पुढे जुना पूना नाका, हाही पर्यायी मार्ग वापरता येईल.