शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विडी बंडलच्या होलसेल पॅकिंगवरील ‘हेल्थ वॉर्निंग’ला केंद्राची स्थगिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 14:31 IST

केंद्राचे एक पाऊल मागे; अन्यथा तीन लाख कामगार जाणार होते संपावर

ठळक मुद्देसध्या विड्यांच्या रिटेल बंडलच्या ८५ टक्के पृष्ठभागावर धोकादायक सचित्र लावले जात आहेआता पुन्हा होलसेल पॅकिंगवर सचित्र लावणे अनावश्यक असल्याची बाजू कारखानदारांनी मांडलीमहाराष्ट्रातील जवळपास दोनशे कारखानदार केंद्रांच्या या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते

सोलापूर : विडी बंडलच्या रिटेल पॅकिंगवर हेल्थ वॉर्निंगचे सहचित्र मजकुरासह वापरणे बंधनकारक आहे. विडी बंडलच्या ८५ टक्के पृष्ठभागावर सदर चित्र लावणे बंधनकारक आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने १ सप्टेंबरपासून विडीच्या होलसेल पॅकिंगवर देखील हेल्थ वॉर्निंगचे चित्र लावणे बंधनकारक केले होते. या निर्णयास विडी कारखानदारांनी विरोध केला. त्यानंतर एक पाऊल मागे घेत केंद्र सरकारने हेल्थ वॉर्निंगच्या चित्राला स्थगिती दिली आहे. महाराष्ट्रातील जवळपास दोनशे कारखानदार केंद्रांच्या या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच कामगार मंत्रालयाने विडीच्या होलसेल पॅकिंगवर हेल्थ वॉर्निंगचे धोकादायक सचित्र लावण्याचे आदेश काढले. त्याची अंमलबजावणी एक सप्टेंबर २०२० पासून करण्याची सूचनाही केली होती. शासनाच्या या निर्देशामुळे कारखानदार भयभीत झाले. सध्या विड्यांच्या रिटेल बंडलच्या ८५ टक्के पृष्ठभागावर धोकादायक सचित्र लावले जात आहे. 

आता पुन्हा होलसेल पॅकिंगवर सचित्र लावणे अनावश्यक असल्याची बाजू कारखानदारांनी मांडली. त्याकरिता कामगार मंत्रालय तसेच आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावाही केला. सध्या कारखानदार अडचणीत आहेत. मागील चार महिन्यात एक विडी देखील विक्री झाली     नाही. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी आमच्याकडून अशक्य आहे. होलसेल पॅकिंगची सक्ती झाल्यास भविष्यात कारखानदार बेमुदत संपावर जातील, असा इशारा दिला. त्यानंतर शासनाला एक पाऊल मागे यावे लागले.

रिटेल पॅकिंगवर शासनाच्या नियमानुसार हेल्थ वॉर्निंगचा सचित्र मजकूर छापला जात आहे. त्यामुळे होलसेलवर काही गरज नाही. होलसेल पॅकिंगवर धोकादायक चित्र लावणे अनावश्यक आहे. त्यामुळे आमच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. हे चुकीचे आहे. आम्हाला मान्य नाही. शासनाने दिलेली स्थगिती दिली हे उत्तमच झाले. - सुधीर साबळे, अध्यक्ष -महाराष्ट्र विडी कारखानदार संघ 

टॅग्स :SolapurसोलापूरSmokingधूम्रपानjobनोकरी