शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
3
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
7
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
10
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
11
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
12
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
13
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
14
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
15
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
16
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
17
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
18
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
19
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
20
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?

सोलापूरच्या निवडणुकीत ‘कास्ट फॅक्टर’ ठरणार प्रभावी

By admin | Updated: January 30, 2017 14:49 IST

सोलापूरच्या निवडणुकीत ‘कास्ट फॅक्टर’ ठरणार प्रभावी

सोलापूरच्या निवडणुकीत ‘कास्ट फॅक्टर’ ठरणार प्रभावीाहेश कुलकर्णी - सोलापूर आॅनलाईन लोकमतनिवडणुकीच्या रणांगणात अनेक छोटे-मोठे पक्ष आपली ताकद आजमावत असले तरी कुठल्याही निवडणुकीचे मुख्य गणित हे जातीवर आधारित असते. जातनिहाय मतदाराचा अभ्यास करून त्या भागात बहुसंख्य असलेल्या जातीला उमेदवार देऊन विजयाचे गणित घातले जाते. सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या सर्वाधिक आहे. सात तालुक्यांमध्ये या समाजाचे वर्चस्व असून इतर चार तालुक्यांमध्ये अन्य समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत.मराठा, धनगर आणि लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पूर्वीपासून जातीच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व होते. बदलत्या राजकीय वातावरणात प्रत्येक समाजाने आपापल्या संघटना स्थापन करून सत्तेत वाटा कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले. कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने काढलेल्या क्रांती मोर्चामुळे समाज एकवटला आहे, परंतु या एकीचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला मिळेल ते सांगणे सध्या तरी अवघड आहे. सर्वच पक्षात मराठा समाजाचे पुढारी असल्याने आणि संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांनीही निवडणूक लढण्याचे जाहीर करून राजकारणात उडी घेतल्याने हा समाज नेमका कोणाच्या बाजूने जाणार याबाबत काही सांगणे कठीण आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाने एकत्र येऊन जिल्ह्यात सर्वत्र आक्रोश मोर्चे काढले आहेत. त्या समाजाचे एकत्रित मतदान होणार की जातनिहाय मतदान होऊन वेगवेगळ्या पक्षांच्या पारड्यात पडणार हे मतदानानंतरच कळेल.जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकावर धनगर समाज आहे. या समाजाने गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन मतदान केले होते. माळशिरस आणि सांगोला या दोन तालुक्यात धनगर समाजाची मोठी ताकद आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या लिंगायत समाजाने सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमध्ये नेहमीच पकड ठेवली. एकेकाळी काँग्रेससोबत असलेला हा समाज सध्या भाजपाबरोबर असल्याने यंदाच्या निवडणुकीत त्याचा काय परिणाम होईल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.तालुकानिहाय समाजाचे वर्चस्वकरमाळा़़़तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, माळी, मागासवर्गीय व मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक समाज आहे. मराठा समाजच या तालुक्याचे राजकीय समीकरणे बदलवतो.माढा़़़तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल माळी, मुस्लीम आणि धनगर समाज आहे. मराठा समाजच या तालुक्याचे राजकीय समीकरणे बदलवतो.पंढरपूर...तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, मागासवर्गीय, मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक समाज आहे. मराठा समाजच या तालुक्याचे राजकीय नेतृत्व करतो.सांगोला़़़़तालुक्यात धनगर समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल मराठा, लिंगायत आणि मुस्लीम समाज आहे. धनगर समाज तालुक्याचे नेतृत्व करतो.माळशिरस़़़़धनगर समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल माळी, मराठा, मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक समाज आहे. मराठा समाजाकडे सत्ता आहे.उत्तर सोलापूऱ़़़़़़़उत्तर सोलापूर तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, मुस्लीम, माळी, लिंगायत आणि मागासवर्गीयांची संख्या आहेत. मराठा समाजाकडे सत्ता आहे.दक्षिण सोलापूऱ़़़़़़़़़दक्षिण तालुक्यात लिंगायत समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, मुस्लीम आणि मराठा समाज आहे. लिंगायत समाज तालुक्याचे नेतृत्व करतो.बार्शी़़़़़़़़़़तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल वंजारी, मुस्लीम, धनगर, माळी समाजाची मते आहेत. मराठा समाज तालुक्याचे राजकारण ठरवतो.मंगळवेढा ़़़़़़़़़़़तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाज आहे. लिंगायत आणि धनगर समाज निर्णायक ठरतो.मोहोऴ़़़़़़़़़़तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, मुस्लीम, माळी, लिंगायत आणि मागासवर्गीयांची संख्या अधिक आहे. इतर समाजाची संख्या अधिक असली तरी राजकीय सूत्रे मराठा समाजाकडे आहेतअक्कलकोट़़़़़़़़़़़़़़.तालुक्यात लिंगायत समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल मुस्लीम आणि मागासवर्गीय समाज आहे. लिंगायत समाज तालुक्याचे नेतृत्व करतो.