शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

समाजात बंधुता अत्यंत आवश्यक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:16 IST

संत किंवा राष्ट्रपुरुष कोणत्याच जाती-धर्माचे नसतात. मात्र, अनुयायांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आणि स्वार्थासाठी त्यांना जाती-धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवले. बंधुतेचे ...

ठळक मुद्देगुन्हेगारालाही माणूस म्हणून समजून घेण्याच्या भूमिकेत बंधुताच निर्णायकजागतिक पेच सोडवितानाही राष्ट्रा-राष्ट्रातील संवाद महत्त्वाचा ठरतो माणसाच्या जगातील सर्वप्रकारच्या भेदांना नाहीसे करण्यासाठी बंधुता उपयोगी ठरते.

संत किंवा राष्ट्रपुरुष कोणत्याच जाती-धर्माचे नसतात. मात्र, अनुयायांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आणि स्वार्थासाठी त्यांना जाती-धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवले. बंधुतेचे मारेकरी सर्व जाती-धर्माचे लोकच आहेत. यामुळे माणसामाणसातील बंधुभावनेला मोडीत काढण्याचे पाप केले जात आहे. समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर बंधुता अत्यंत आवश्यक आहे.

भाषा हा सोहळ्यांचा नाही तर जगण्याचा विषय आहे अन् हे फक्तसाहित्यातील एक अलंकारिक वाक्य किंवा प्रेरक सुविचार नाही. याला भक्कम शास्त्रीय आधार आहे. ‘दुसरी भाषा शिकणे म्हणजे काही गोष्टींसाठी नवीन शब्द शिकणे असे नसून, गोष्टींबद्दल विचार करण्याचे दुसरे मार्ग शिकणे होय़’ 

वाचनसंस्कृती वाढवायची असेल, तर आपणच प्रयत्न करायला हवेत. पुस्तके वाचायला हवीतच; पण त्याचबरोबर माणसे वाचायला हवीत. निसर्ग वाचायला हवा. वाचनात वैविध्य हवे. स्थानिक लेखकांचे कौशल्य ओळखून त्यांचे साहित्यही आपण वाचायला हवे़ भारतीय लोकशाहीच्या गाभ्याचे अधिष्ठान स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या सूत्रावर आधारित आहे. मात्र, या मूल्यात्मक सूत्रांना आपण समान पातळीवर स्वीकारले आहे का? हा प्रश्नच आहे.

स्वातंत्र्य व समता या दोन तत्त्वांना अति महत्त्व देऊन राज्यकारभार केला. बंधुता नसेल तर या दोन तत्त्वांना अर्थ नाही. बंधुता तिसºया स्थानी आहे. मात्र, हे लक्षात घेतले पाहिजे की, बंधुताच शोषणमुक्त भारत निर्माण करू शकते. मुळात बंधुता ही संकल्पनाच भावना व विचार यांची एकात्मता सिद्ध करणारे मूल्य आहे. त्यामुळे बंधुतेच्या संकल्पनेत मानवता, करुणा, प्रेम, वात्सल्य, दया या मूल्यांचा अंतर्भाव आढळतो. समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर बंधुता अत्यंत आवश्यक आहे. आज राष्ट्रपुरुष जातीजातीत विभागले गेले आहेत, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्त्वे समृद्ध केली पाहिजेत.

गुन्हेगारालाही माणूस म्हणून समजून घेण्याच्या भूमिकेत बंधुताच निर्णायक दिसते. सूडभावनेपेक्षा बंधुता श्रेष्ठ ठरते. जागतिक पेच सोडवितानाही राष्ट्रा-राष्ट्रातील संवाद महत्त्वाचा ठरतो. माणसाच्या जगातील सर्वप्रकारच्या भेदांना नाहीसे करण्यासाठी बंधुता उपयोगी ठरते. त्यामुळे श्रीमंत-गरिबात बंधुता आणण्याची गरज आहे. बंधुतेशिवाय समता पेरली जाऊच शकत नाही. बंधुतेची उपेक्षा जगाला परवडणारी नाही. तिसºया महायुद्धालाही बंधुताच तारू शकते.

ज्या भाषेच्या आधारावर हे साहित्य व संस्कृती उभी आहे, त्याबाबत फारसे बोलले जात नाही. अन् बोलले गेलेच तर केवळ बोलाची कढी अन् बोलाचा भात अशी परिस्थिती असते. त्यातून प्रत्यक्ष पानात काहीच पडत नाही. भाषा हा सोहळ्यांचा नाही, तर जगण्याचा विषय आहे. अन् हे फक्त एक साहित्यातील अलंकारिक वाक्य किंवा प्रेरक सुविचार नाही. याला भक्कम शास्त्रीय आधार आहे. आपण बोलत असलेल्या भाषेचा आपल्या विचारप्रक्रियेवर परिणाम होतो का, यावर संशोधक अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत.

आपली संस्कृती-परंपरा, जीवनशैली, सवयी अशा आपल्या सवयीचे भाग असलेल्या गोष्टी आपण आपल्या जीवनातून घेतो आणि आपण त्या पद्धतीनेच विचार करायला लागतो. आपली अभिव्यक्तीही त्यानुसारच होत असते. भाषा, संस्कृती आणि विचारांची सवय या सर्व गोष्टी बहुतेकदा एकत्रच वाढतात. जर तरुण पिढीच्या झुंडीच्या झुंडी मराठीची कास सोडून इंग्रजीचा पदर धरत असतील तर त्यांची विचारप्रक्रियाही वेगळी होणार. थोडक्यात म्हणजे मराठी संस्कृतीचा एक लचकाच आपण तोडत आहोत. दरवर्षी लाखो विद्यार्थी या हिशेबाने हे लचके तोडले जात आहेत. निकडीचा विषय तो आहे, आपल्या हातात घ्यायचा विषय तो आहे. ही लचकेतोड थांबवायची असेल, तर भाषा हा वार्षिक सोहळ्यातील एक दागिना होता कामा नये, तो आपल्या जगण्याचा विषय व्हावा! -सूर्यकांत खटके,(लेखक हे सोलापूर येथे अप्पर कोषागार अधिकारी आहेत) 

टॅग्स :Solapurसोलापूर