शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढ्यात सख्ख्या भावाने भावाचे कुटुंब पेटवले, मुलाचा मृत्यू; पती-पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 22:40 IST

कर्ज फेडण्यासाठी भाऊ पुढाकार घेत नाही या कारणावरून चिडून जाऊन सख्ख्या भावाच्या कुटुंबाला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना महंमदाबाद (हुन्नुर) ता.मंगळवेढा येथे ६ नोव्हेंबर रोजी घडली.

सोलापूरः कर्ज फेडण्यासाठी भाऊ पुढाकार घेत नाही या कारणावरून चिडून जाऊन सख्ख्या भावाच्या कुटुंबाला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना महंमदाबाद (हुन्नुर) ता.मंगळवेढा येथे ६ नोव्हेंबर रोजी घडली. यात शरद सोपान घुंबरे (वय १२) जास्त भाजल्याने याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सोपान रामचंद्र घुंबरे (वय ४५) व सोनाबाई सोपान घुंबरे (वय ४०) हे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, लक्ष्मण रामचंद्र घुंबरे (वय ४२) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी सोपान रामचंद्र घुंबरे, पत्नी सोनाबाई व मुलगा शरद असे महंमदाबाद (हुन्नुर) लक्ष्मी चौक येथील घराचा दरवाजा उघडा ठेवून घरात झोपले असताना फिर्यादीचा सख्खा भाऊ आरोपी लक्ष्मण रामचंद्र घुबरे याने फिर्यादीच्या घरात येऊन फिर्यादी, त्याचे झालेले कर्ज फेडण्यासाठी पुढाकार घेत नाही.तसेच रेशनिंग कार्ड वेगवेगळे करण्याकरिता असणाऱ्या त्रुटींची पूर्तता करत नाही या कारणावरून चिडून जाऊन त्याने सोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीतील पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर व फिर्यादीच्या पत्नी सोनाबाई तसेच मुलगा शरद यांच्या अंगावर टाकून त्याचे जवळील काडी पेटीने पेटवून दिले यात मुलगा शरद याला जास्त भाजले असल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर पती-पत्नी हे गंभीर जखमी झाले आहेत.