शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; पंढरपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; प्रदक्षिणा मार्ग होणार सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 10:48 IST

पोलीस व आरोग्य विभाग सतर्क; आठजणांचा अहवाल बाकी

पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत येण्यासाठी भाविकांना बंदी केली आहे, तरीही प्रदक्षिणा मार्गावर रोज भाविक पंढरपुरात आढळून येत आहेत. यामुळे २९ जून ते २ जुलै असे यात्रेचे चार दिवस पंढरपूर शहर व शहरालगतचा ५ किमी परिसरात संचार बंदी लागू करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र आता प्रदक्षिणा मार्गावरच एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे. यामुळे संचारबंदीचा निर्णय येण्यापुर्वीच अधिकचा उपाय म्हणून व इतर नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी प्रदक्षिणा मार्ग सिल करण्यात येणार आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी इतर जिल्ह्यातून आलेले व कोरोनाबाबची लक्षणे आढळून आलेल्या स्थानिक नागरीकांचे असे ४७ जणांचे आरोग्य विभागाकडून स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी ३९ जणांचा अहवाल आहे.  ३६ जण निगेटिव्ह आहेत, तर त्यामध्ये २ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. तर आठ जणांचा अहवाले येणे बाकी आहे. त्याचबरोबर एकाचा स्वॅब व्यवस्थित घेतला गेला नव्हता.

या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात कितीजण आले याबाबतचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभागा मार्फत सुरु आहे. त्याचबरोबर त्या आठ जणांच्या अहवाल पॉझिटिव्ह येतो की, निगेटिव्ह याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

---------------------------------------

प्रदक्षिणा मार्गावरील एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे शहरातील नागरीकांच्या आरोग्याचा दृष्टीने प्रदक्षिणा मार्ग कंन्टमेंट झोन करण्यात येणार आहे. या परिसरात इतर नागरीकांना जाऊ नये. त्या परिसरातील नागरीकांनीही घराबाहेर पडू नये.- वैशाली वाघमारेतहसिलदार, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरcorona virusकोरोना वायरस बातम्या