शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

भाजलेल्या, उकडलेल्या शेंगा अन् पुदिना चटणी.. खमंगपणा देणाºया ‘स्ट्रीट मेन्यु’ची सोलापुरात वाढतेय मागणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:10 IST

दररोज लाखोंची उलाढाल : घुंगरू शेंगांना जास्त मागणी

ठळक मुद्देसोलापूरकर हे नेहमीच शेंगाप्रेमी शेंगा चटणी असो की शेंगा पोळी शेंगा भाजी असो की शेंगा लाडू आतातर पावसाळी वातावरणात भिजल्या पावसात वाफाळलेल्या शेंगा व पुदीना चटणी खाण्यासाठी सोलापूरकरांच्या उड्याच पडतायतओल्या शेंगामध्येही दोन प्रकार बरं का़.. एक भाजलेल्या तर दुसºया उकडलेल्या़  सोलापूरकरांना शेंगा आवडतात़ हे कोणाला सांगायची गरज नाही

रूपेश हेळवे 

सोलापूर : सोलापूरकर हे नेहमीच शेंगाप्रेमी शेंगा चटणी असो की शेंगा पोळी शेंगा भाजी असो की शेंगा लाडू ... सोलापूरकरांना शेंगाचे सारेच पदार्थ आवडतात़ आतातर पावसाळी वातावरणात भिजल्या पावसात वाफाळलेल्या शेंगा व पुदीना चटणी खाण्यासाठी सोलापूरकरांच्या उड्याच पडतायत़ या ओल्या शेंगामध्येही दोन प्रकार बरं का़.. एक भाजलेल्या तर दुसºया उकडलेल्या़ सोलापूरकरांना शेंगा आवडतात़ हे कोणाला सांगायची गरज नाही.

 मराठवाडा, उस्मानाबाद, दक्षिण सोलापूर आदी भागात शेंगाच्या उत्पादनासाठी उपयुक्त अशी जमीन आहे़ यामुळे या भागात शेंगाचे पीक हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते़ यामुळे सोलापुरात शेंगा कमी दरातच उपलब्ध असतात़ शेंगाचे दर कमी असो वा जास्त असो सोलापुरात मागणी मात्र कधीच कमी होताना दिसत नाही़ यामुळे अनेक शेतकरी प्रत्येक वर्षी न चुकता शेंगाचे पीक घेतात़ याच शेंगामुळे लाखोंची उलाढालही सोलापूर बाजार समितीमध्ये दररोज होत असते़ 

भाजलेल्या शेंगा, उकडलेल्या शेंगा या विकताना पाहिले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही़ शेंगा या पावसाळ्यात भिजत खाण्याची मजा काही औरच असते़ शेंगा या फक्त चवच देत नाही तर यामुळे शरीराला आवश्यक असलेले प्रोटीनही यामधून मिळतात़ शेंगामुळे वजन वाढण्यासही मदत होते़ पावसाळा सुरू झाला की कणिस, कच्च्या शेंगा बाजारात येतात़ बाजारातही यांना चांगली मागणी असते़ भाजक्या उकडलेल्या शेंगा खाल्ल्यामुळे फक्त जिभेचीच चव भागत नाही तर शेंगा या शरीरालाही पोषक असतात़ यामुळेच डॉक्टरही शेंगा खाण्याचा सल्ला देत असतात़ शेंगदाण्यामध्ये ओमेगा-६ फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळते. चांगल्या त्वचेसाठीही फायदेशीर असते़ त्वचेसाठी उत्तम मानले जाते. 

सध्या उकडलेल्या शेंगांना जास्त मागणी आहे. भाजक्या शेंगापेक्षा उकडलेल्या शेंगा या जास्त आवडीने खाल्ल्या जातात. घुंगरू, डबल, आणि जबलपुरी अशा प्रकारच्याही शेंगा असतात. पण यापैकी घुंगरू शेंगा म्हणजेच जवारी शेंगांना जास्त मागणी असते़ यामुळे या शेंगा जास्त आवडीने खाल्ल्या जातात. शेंगदाण्यामध्ये काजूप्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्यामध्ये तेल असल्यामुळे हे पोटाचे आजार नष्ट करतात. याच्या नियमित सेवनाने पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्या दूर होते़

शेंगदाण्यामधील गुण- शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीआॅक्सिडेंट भरपूर प्रमाणात असते. शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात.

आमच्याकडे खारीमुरी शेंगा, साधी टरफल खारी शेंगा, बेसन शेंगा, मसाला शेंगा तयार केल्या जातात़ सध्या पावसाळ्यामध्ये सर्वच प्रकारच्या शेंगांना जास्त मागणी आहे़ दिवसाकाठी प्रत्येक प्रकारच्या शेंगा या ५० किलोपर्यंत विकल्या जातात़ - सुनील सिद्धे, शेंगा व्यापारी 

भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि फॅट जास्त असते़ ज्यांना वजन वाढवायचे आहे, अशांनी शेंगदाणे खावे़ भाजलेले शेंगदाणे हे सालीसह खावे हे शरीराला चांगले असते़ सालीमुळे शरीराला आवश्यक असे आॅईल मिळते़ उकडून शेंगा खात असाल तर अतिशय चांगले आहे़ पण यामध्ये मीठ टाकू नये. मीठ टाकल्यामुळे सोडियम वाढते. ब्लडप्रेशर वाढू शकतो़ उपवासात शेंगाचा वापर जास्त होतो, त्यावेळी पित्ताचा त्रास होतो़ यामुळे शेंगा जास्तही शरीरास चांगल्या नसतात. लहान मुलांना दिवसातून मूठभर शेंगा खायला देण्यास हरकत नाही.- डॉ़ अश्विनी अंधारे, आहारतज्ज्ञ

शेंगाचा भाव सध्या ५० ते ६० रुपये किलो आहे. पण गिºहाईक उकडलेल्या शेंगा आणि भाजलेल्या शेंगा या दहा आणि वीस रुपयांच्या घेतात, कच्च्या शेंगा मात्र किलोने घेतात. - संगीता संजय शिंदेशेंगा विक्रेत्या 

टॅग्स :Solapurसोलापूरhotelहॉटेल