शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

मुंडेंच्या आठवणींना उजाळा

By admin | Updated: June 12, 2014 01:25 IST

सर्वपक्षीय शोकसभा : मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना

सोलापूर : १९८५ सालात राज्यात आलेल्या पुलोद सरकारपासून महाराष्ट्रातील घटना, घडामोडी केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांची सोलापूरशी असलेली नाळ याबाबत मनोगत व्यक्त करीत सर्वपक्षीय शोकसभेत नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शोकसभेत’ जुन्या आठवणी ताज्या करण्यात आल्या. या शोकसभेला आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, रिपाइं (आठवले) चे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर, रिपाइं (गवई) चे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, उपमहापौर हारून सय्यद, स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री, नगरसेवक शिवा बाटलीवाला, पेंटप्पा गड्डम, नंदकुमार मुस्तारे, वीरभद्रेश बसवंती, दिनेश शिंदे, प्रभाकर वनकुद्रे, बिज्जू प्रधाने, माजी महापौर आरिफ शेख, वसंत आपटे, भाजपाचे शहर चिटणीस राजू माने, रिपाइंचे नेते के. डी. कांबळे, अजित गायकवाड, वसंत आपटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्व राजकीय नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सोलापूरशी गोपीनाथ मुंडे यांचा स्नेहसंबंध कसा होता, त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने प्रेरणा दिली होती. सोलापुरातील कार्यकर्त्यांना ते कसे ओळखत होते, नावानिशी त्यांचा परिचय कशा पद्धतीने देत होते. याच्या आठवणी सांगत नेत्यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली. सामान्य कार्यकर्त्यांबद्दल संवेदनशील असलेले गोपीनाथ मुंडे यांनी कोणत्याही प्रकारचा जातिभेद न करता दलित, मुस्लीम आणि ओ.बी.सी.बद्दल ते कसे आग्रही होते. त्यांच्यात सर्वसमावेशक दृष्टी कशी होती, शरद पवार, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुलोदचे सरकार आल्यावर त्यांनी सोलापुरात कार्यकर्त्यांना कसे प्रोत्साहित केले होते. एखाद्या गोष्टीकडे त्यांनी जातीने कसे लक्ष दिले होते. या सर्व गोष्टींना नेत्यांनी यावेळी उजाळा देत गोपीनाथ मुंडेंच्या कार्यकर्तृत्वाची आठवण करून दिली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर, माजी भाजपा शहराध्यक्ष कर्नल प्रभाकर लांडगे, भाजपाचे नेते विश्वनाथ बेंद्रे, स्थायी समिती अध्यक्ष बाबा मिस्त्री, प्रकाश आळंदकर, नगरसेवक नागेश वल्याळ, माजी महापौर आरिफ शेख, मोहोळचे युवा नेते संजय क्षीरसागर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. -------------------------लोकनेता हरपलाकेंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने भाजपातील एक लोकनेता हरपला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. मुंडेंच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दु:खातून त्यांना बाहेर पडण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना, असा शोकसंदेश आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला.