शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबांचं भक्कम बळ असलेली दृष्टीहीन कुंती म्हणते : कलेक्टर होण्याचं माझं आहे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:55 IST

जागतिक दिव्यांग दिन विशेष स्टोरी

 नारायण चव्हाणदक्षिण सोलापूर : बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला अन्‌ अनेकांच्या भुवया उंचावल्या. केगाव (बु.) येथील जन्मतः अंधत्वाचा शाप मिळालेली कुंती शिरसाड ही करजगी केंद्रातून सर्वप्रथम आली. शाळेत न जाता तिनं मिळविलेल्या यशानं सर्वांना चकित केले. आई-बाबांच्या भक्कम पाठबळामुळेच तिने हे यश मिळवलंय. कलेक्टर बनण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगलं आहे.

वडील साहेबगौडा शिरसाड (माध्यमिक शिक्षक) यांचा तिच्या यशातील वाटाही तितकाच मोलाचा होता. कुंती शिरसाड ही जन्मजात दोन्ही डोळ्यांनी अंध असून, तिच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देता यावे म्हणून तिच्या आई-बाबांनी तिच्यानंतर दुसरे अपत्य होऊ दिले नाही. मुंबईच्या नॅब संस्थेकडून आठवीपासून तिच्या पालकांनी अभ्यासाची ऑडिओ कॅसेट मागविली. अभ्यासासोबतच कुंती कविताही लिहिते. शिवाय संगीताच्याही परीक्षा देत आहे. कुंतीच्या यशात तिच्या शिक्षकांबरोबरच तिची आई सरोजनी आणि वडील साहेबगौडा शिरसाड यांचा वाटा आहे.

बारावीच्या परीक्षेत करजगी केंद्रात ती सर्वप्रथम आली. तिने ८३.६९ टक्के गुण मिळवत सर्वांना अचंबित केले. पुढील शिक्षणासाठी कुंती मुंबईमधील महाविद्यालयात प्रवेश घेणार असून, यापुढील महाविद्यालयीन परीक्षा लेखनिकाच्या मदतीशिवाय तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:च लिहिण्याचा निर्धार तिने केला आहे.

‘लोकमत’शी बोलताना ती म्हणते , मला भविष्यात आयएएस व्हायचे आहे. आतापासूनच स्पर्धा परीक्षा अभ्यासाला सुरुवात केली आहे. पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवून माझ्यासारख्या गरजूंना मदत करायची आहे. अंध व्यक्तींना उपयोगी पडतील अशी ‘ब्रेलमी’ आणि ‘किबो रीडर’ यांसारखी अत्याधुनिक साधने घेण्याची तयारीही तिच्या आईंनी दर्शविली. पुढील शिक्षणासाठी कुंतीला मुंबईला पाठविण्याचा निर्णय आई-वडिलांनी घेतला आहे.

कुंती आमचं सर्वस्व आहे. ती ध्येयवादी आहे. तिचं आयुष्य सुंदर घडवण्यासाठी हवं ते करण्याची आमची तयारी आहे. आमची सारी स्वप्नं ती नक्की पूर्ण करेल.

- साहेबगौडा शिरसाड,  

कुंतीचे वडील

सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजमध्ये बी.ए.च्या वर्गात मी प्रवेश घेतला. ऑनलाइन अभ्यास       सुरू आहे. माझे ध्येय    पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याची पूर्ण तयारी आहे. माझ्यासह आई-वडिलांचे स्वप्न  साकार करण्याचा प्रयत्न आहे. अंधत्व माझ्यासाठी कधीच अडथळा वाटत नाही.-कुंती शिरसाड 

टॅग्स :Solapurसोलापूर