शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडलाय, आमदार प्रणिती शिंदे यांची भाजप सरकारवर टिका, बसवनगर येथे नव्या लोकप्रतिनिधींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 13:36 IST

निवडणुकीत भाजपा नेत्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती़ प्रचारसभेत आश्वासनांचा पाऊस पडायचा़ आता सत्तेत आल्यावर त्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे़ मूळ प्रश्न बाजूला ठेवून नवीन विषय चर्चेला आणले जात आहेत़

ठळक मुद्देभाजपा सरकारच्या धोरणावर चौफेर हल्ला : आ़ प्रणिती शिंदे नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली़ बेरोजगारी वाढली़ लघुउद्योग बंद पडले़ विदेशातील गुंतवणूक वाढली नाही़ : आ़ प्रणिती शिंदे सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले़ जनतेसाठी आता आपली चूक कळून आली : आ़ प्रणिती शिंदे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : निवडणुकीत भाजपा नेत्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती़ प्रचारसभेत आश्वासनांचा पाऊस पडायचा़ आता सत्तेत आल्यावर त्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे़ मूळ प्रश्न बाजूला ठेवून नवीन विषय चर्चेला आणले जात आहेत़, अशी टीका क ाँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बसवनगर (ता़ दक्षिण सोलापूर) येथे बोलताना केली़बसवनगर (तेरामैल) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच जगदेवी देशमुख आणि सदस्यांचा सत्कार आ़ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी त्या बोलत होत्या़ अध्यक्षस्थानी माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे होते़ दक्षिण सोलापूर तालुका एनएसयुआयच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती़ भाजपा सरकारच्या धोरणावर चौफेर हल्ला करताना आ़ प्रणिती शिंदे म्हणाल्या,  नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली़ बेरोजगारी वाढली़ लघुउद्योग बंद पडले़ विदेशातील गुंतवणूक वाढली नाही़ सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले़ जनतेसाठी आता आपली चूक कळून आली आहे़ त्यांच्याच पक्षाचे मंत्री गिरीश बापट येणाºया निवडणुकीत सत्तेतून पायउतार होईल याची कबुली देत आहेत़ कार्यक्रमास नांदणीचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे, अनंत म्हेत्रे, उपसरपंच रुक्मिणी राठोड, शांताबाई पवार, विलास राठोड, वाघेश म्हेत्रे, सिद्धाराम देशमुख, गेनसिद्ध शेंडगे, आनंद देशमुख,पल्लेश राठोड उपस्थित होते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदे