शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भरारी घेता-घेता पक्षी पतंगाच्या मांजात फसला; पक्षीप्रेमी अन् लोकांच्या मदतीने सुखरूप सुटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 16:23 IST

वन अधिकाºयांची तत्परता : उपचाराने ‘राखी धनेश’ची निसर्गात भरारी

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यांपासून पक्ष्यांबद्दलची आपुलकी सोलापूकरांमध्ये वाढीस लागल्याचे दिसू लागलेअनेकांनी आपल्या घरासमोर, कॉलनीमध्ये आपापल्या परीने घरटी, धान्य ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासलीकुठे एखादा पक्षी संकटात पडला तरी तत्काळ पक्षीप्रेमींना खबर दिली जात आहे

सोलापूर : निसर्गामध्ये स्वच्छंद भरारी घेता-घेता राखी धनेश नामक मोठा पक्षी पतंगाच्या मांजामध्ये फसला.. विजापूर रोडवरील कोर्ट कॉलनीमधील ही घटना.. लागलीच पक्ष्यांप्रति प्रेम असलेली मंडळी धावली.. लगबगीनं त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला.. त्यांनीही तत्परता दाखवून केलेल्या प्रयत्नानं एक दिवसाच्या मुक्कामानंतर बुधवारी त्याला पुन्हा निसर्गाच्या स्वाधीन केले. मोकळा श्वास घेत या पक्ष्यानंही मुक्तपणे भरारी घेतली.

या घटनेची पार्श्वभूमी अशी की, २५ जून मंगळवारचा दिवस.. विजापूर रोडवरील कोर्ट कॉलनी परिसरात आकाशात भरारी घेणारा एक मोठा पक्षी पतंगाच्या मांजामध्ये फसल्यामुळे तो जायबंदी झाला होता. कोणीतरी वन विभागाला कॉल करण्याची सूचना केली. काही उत्साही मंडळींनी लागलीच फोन न करता थेट वन परिक्षेत्र अधिकरी निकेतन जाधव यांच्या घराचा पत्ता शोधत त्यांच्या घरी पोहोचले. जाधव दिवसभर कामाच्या निमित्ताने प्रवास करून घरी आलेले. त्यांनी लागलीच पक्षी बरा झाला पाहिजे, या भावनेतून घटनास्थळी धाव घेतली.

तेथील लोकांच्या मदतीने जायबंदी झालेल्या राखी धनेश पक्ष्याला खाली उतरवले. टॉवेलच्या साहाय्याने त्याला पकडून घराकडे आणले. या घटनेची माहिती समजताच पक्षीमित्र मुकुंद शेटे व प्रवीण जेऊरे, अ‍ॅनिमल राहतचे डॉ. राकेश चित्तोडही पोहोचले. या पक्ष्याची पाहणी केली असता त्याला फक्त पायाजवळ किरकोळ जखम झाल्याचे आढळून आले. मात्र तो पक्षी कमालीचा घाबरलेला होता. त्याच्यावर उपचार करून वन विभागाच्या पिंजºयात ठेवण्यात आले. त्याची भीती नाहीशी व्हावी म्हणून पिंजरा चारी बाजूने कापडाने झाकण्यात आला. बुधवार २६ जून दुसरा दिवस उजाडला. सकाळी ९ वाजता डॉ. राकेश चित्तोड, मुकुंद शेटे, वन परिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव यांच्या उपस्थितीत ज्या ठिकाणी तो जायबंदी झाला होता तेथे नेऊन या पक्ष्याला निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करण्यात आले. मुक्तता होताच पक्षी उड्डाण घेऊन समोरील लिंबाच्या झाडावर बसला. सोलापूरकर, वन अधिकारी, पक्षीप्रेमींमुळेच एका जखमी पक्ष्याला पुन्हा जीवदान मिळाले.

सजगता वाढतेय..- गेल्या काही महिन्यांपासून पक्ष्यांबद्दलची आपुलकी सोलापूकरांमध्ये वाढीस लागल्याचे दिसू लागले आहे. अनेकांनी आपल्या घरासमोर, कॉलनीमध्ये आपापल्या परीने घरटी, धान्य ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. कुठे एखादा पक्षी संकटात पडला तरी तत्काळ पक्षीप्रेमींना खबर दिली जात आहे. पतंगाच्या मांजात अडकलेल्या राखी धानेश पक्ष्याच्या बाबतीतही कोर्ट कॉलनी परिसरातील लोकांनी दाखवलेल्या माणुसकीमुळेच त्याची सुखरूप सुटका होऊ शकली.

टॅग्स :Solapurसोलापूर